Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणी शरद पवारांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
हॅलो जनता न्युज, मुंबई :
बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच स्व. संतोष देशमुख (Santosh Deshmukh Case) यांच्या निर्घृण हत्येचा मुद्दा सध्या राज्यभरात गाजत आहे. विरोधकांनी या घटनेच्या संदर्भात सरकारवर जोरदार आरोप करत, संतोष देशमुख यांच्या हत्येची निषेधाची लाट उभी केली आहे. या प्रकरणात सहा आरोपींना अटक झाली असून, एक आरोपी अद्याप फरार आहे. हत्येमध्ये वाल्मिक कराड आणि त्यांचे नेते धनंजय मुंडे यांचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचा आरोप विरोधकांनी सातत्याने केला आहे. या प्रकरणातील गडबडीमुळे विरोधकांची संतापजनक प्रतिक्रिया सतत येत आहे, आणि धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे.
या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहून संतोष देशमुख हत्येच्या तपासावर चिंता व्यक्त केली आहे. पवार यांनी पत्रात म्हटले आहे की, “या हत्येचा तपास अद्याप पूर्णपणे होऊ शकलेला नाही आणि आरोपी मोकाट आहेत. हे एक माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे.”
Santosh Deshmukh Case : शासनाने तातडीने सुरक्षा पुरवावी
पवार यांनी या प्रकरणात सार्वजनिक सुरक्षा आणि गुंडांच्या वाढत्या प्रभावावरही चिंता व्यक्त केली आहे. शरद पवार यांनी सांगितले की, “संतोष देशमुख हत्येच्या प्रकरणात अनेक नेत्यांनी आवाज उठवला आहे आणि त्यांना यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. राज्य शासनाने तातडीने त्यांना सुरक्षा पुरवावी.” पवार यांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला, की बीड-परळी भागात अशा गुंड प्रवृत्त्यांचा इतिहास आहे आणि यापूर्वी देखील माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अनेक घटनांचा सामना करावा लागला आहे. “या गुंड प्रवृत्त्यांना आता जडबूतीने हाणून टाकण्याची गरज आहे,” असे पवार म्हणाले.
त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्राद्वारे सूचित केले की, राज्य सरकारने या लोकप्रतिनिधींच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घ्यावा आणि त्यांना योग्य पोलिस सुरक्षा प्रदान करावी. पवार यांच्या या पत्रामुळे या हत्येच्या प्रकरणाची आणखी गंभीरतेने चर्चा होईल, हे नक्की.
Santosh Deshmukh Case : मी राजीनामा देण्याची गरज नाही – धनंजय मुंडे
Santosh Deshmukh : बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख हत्येची गुऱ्हाळ; तपासासाठी स्थापन केली एसआयटी
Jalgaon MIDC : चटई कंपनीला लागलेल्या आगीत 100 टनापेक्षा जास्त प्लास्टिक साहित्य खाक