Headlines

🚨अमळनेर ब्रेकिंग : मंत्रिपदाच्या वल्गना करण्यापेक्षा स्वतःला सिद्ध करा – माजी आमदार शिरीष चौधरी

हॅलो जनता न्यूज, अमळनेर – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे मंत्री माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या रिक्त झालेल्या मंत्रिपदावर कुणाची वर्णी लागणार, यावर राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. विशेषतः उत्तर महाराष्ट्रातून अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल पाटील यांना मंत्रिपदाची संधी मिळू शकते, अशा चर्चांना सध्या उधाण आले आहे.

दरम्यान, या चर्चांवर शिवसेना (शिंदे गट) चे अमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये आमदार अनिल पाटील एकही नगराध्यक्ष निवडून आणू शकले नाहीत, अशा परिस्थितीत त्यांना कोणत्या आधारावर मंत्रिपद दिले जाईल, असा सवाल सुरेश चौधरी यांनी उपस्थित केला आहे.

अमळनेर : क्रीडामंत्री पद मिळणार ही वल्गना आहे…

“आमदार अनिल पाटील यांना क्रीडामंत्रीपद मिळणार असल्याच्या चर्चा केवळ वल्गना आहेत. या चर्चा त्यांनीच सुरू केल्या आहेत. वरचे लोक हुशार आहेत. उत्तर महाराष्ट्रात त्यांच्या पक्षाचा एकही नगराध्यक्ष निवडून आलेला नाही. अशा परिस्थितीत कोणत्या कामगिरीच्या जोरावर त्यांना मंत्रिपद देण्यात येईल?” अशी बोचरी टीका चौधरी यांनी केली.

चौधरी पुढे म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत पक्षाची ताकद सिद्ध करण्यात अपयश आले असताना मंत्रिपदाच्या चर्चा करणे म्हणजे जनतेची दिशाभूल करण्यासारखे आहे. त्यामुळे अनिल पाटील यांना मंत्री करण्याच्या चर्चा केवळ राजकीय अफवा असून प्रत्यक्षात तसे काही होण्याची शक्यता नाही, असा दावा त्यांनी केला.

दरम्यान, माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यानंतर अजित पवार गटातील नेतृत्वाकडून अद्याप कोणतेही अधिकृत संकेत देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे मंत्रिमंडळातील रिक्त जागेबाबत सध्या तरी केवळ तर्क-वितर्क आणि राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असून, प्रत्यक्ष निर्णय काय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या…

आंचळगाव येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न.

जळगाव मनपा : प्रभाग क्रमांक ७ मधून महेश वर्मा यांच्या उमेदवारीची जनतेतून मागणी…

जळगाव मनपा निवडणूक : प्रभाग क्रमांक ४ मध्ये अश्फाक खाटीक यांना नागरिकांचा वाढता पाठिंबा

6,066Popular Reads (Illustrative)
हॅलो जनताही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Designed & Developed by SM SOLUTION