Headlines

चौकशीतील दिरंगाई चोपडा पोलिसांच्या अंगाशी, नेमका काय आहे प्रकार…

हॅलो जनता न्युज (चोपडा) चोपडा येथील मुस्तफा अँग्लो उर्दू प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांच्या संशयास्पद भरती प्रक्रियेविरोधात दाखल गुन्ह्याच्या तपासात दिरंगाई केल्याने चोपडा पोलिसांना दि. १५ मार्च रोजी उच्च न्यायालयात हजर राहण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. खोट्या स्वाक्षऱ्या, दस्तऐवज बनवून १३ शिक्षकांची पदभरती करून शासनाचा निधी लाटल्याची तक्रार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चिरागोद्दीन शेख…

Read Full News

तीन दिवस रेल्वेचा मेगा ब्लॉक, रेल्वेच्या वाहतुकीवर “असा” होईल परिणाम…

हॅलो जनता, भुसावळ प्रतिनिधी – भुसावळ रेल्वे विभागातील जळगाव आणि भादली रेल्वे स्थानका दरम्यान तीन दिवस विशेष वाहतूक व पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे. आजपासून सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत हा विशेष वाहतूक व पॉवर ब्लॉक आजपासून लागू करण्यात आला आहे. १ मार्च पासून ३ मार्च पर्यंत हा पावर ब्लॉक राहणार असून प्रवाशांनी आपल्या प्रवास…

Read Full News

गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन

गजानन गिरी (विशेष प्रतिनिधी) पाचोरा – आज दि. 28 रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त पाचोरा शहरातील गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल मध्ये विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे अनिल भाई दुलानी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करत उद्घाटन करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रेम शामनानी, अनिल भाई दुलानी, राम केसवानी, हरी भाऊ पाटील, डॉ. मनीष चंदनानी,…

Read Full News

पाचोरा तालुक्यात चोरट्यांचा सुळसुळाट, जारगावात घरफोडी लाखोंचा ऐवज लंपास

हॅलो जनता न्युज विशेष प्रतिनिधी (गजानन गिरी)  पाचोरा शहरासह परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट वाढला असून पाचोरा तालुक्यातील जारगाव येथील सेवानिवृत्त पोस्टमास्तर यांच्या बंद घरात चोरट्यांनी डल्ला मारून लाखों रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या प्रकरणी पाचोरा पोलिस स्थानकात अज्ञात चोरट्याविरोधात चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, सेवानिवृत्त पोस्टमास्तर सुभाष फकिरा मोरे यांचे…

Read Full News
आकाशवाणी चौकातील हॉटेल

आकाशवाणी चौकातील हॉटेलच्या किचनला आग ; मेडीकल दुकानाचे नुकसान !

हॅलो जनता न्युज, जळगाव : जळगाव शहरातील आकाशवाणी चौकातील हॉटेल मुरली मनोहरच्या किचनमध्ये गुरुवार दि. ६ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे २ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. काही वेळातच आगीने रौद्ररुप धारण केले. या आगीमुळे बाजूला असलेल्या मेडीकलच्या दुकानाचेही नुकसान झाले आहे. दरम्यान, अग्निशमन विभागाच्या बंबाने आगीवर नियंत्रण मिळवित आग आटोक्यात आणली. शहरातील आकाशवाणी चौकातील तळघरात…

Read Full News
Jalgaon Crime

Jalgaon Crime : घराबाहेर उभी असलेली रिक्षा टवाळखोरांनी पेटविली

हॅलो जनता न्युज, जळगाव : जळगाव (Jalgaon Crime) शहरातील शिवाजी नगर परिसरात घराबाहेर उभी ऑटो रिक्षा अज्ञात टवाळखोरांनी पेटवून दिल्याची घटना घडली. मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेत ऑटोरिक्षा चालकाने शहर पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. जळगाव (Jalgaon Crime) शहरातील शिवाजीनगर लाकूड पेठ भागात अजय राजेंद्र जगताप कुटुंबीयांसह वास्तव्यास आहेत. ऑटोरिक्षा चालवून ते…

Read Full News
बंद घर फोडून चोरी

धरणगावात बंद घर फोडून चोरी, गुन्हा दाखल !

धरणगाव (प्रतिनिधी) येथील चिंतामण मोरया परिसरातील स्वामी समर्थ नगरातील आनोरे विद्यालयाचे मुख्याध्यापक एम.एच. चौधरी यांचे बंद घर फोडल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी रोकडसह सोन्याचे दागिने लंपास केले आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील स्वामी समर्थ नगरातील आनोरे विद्यालयाचे मुख्याध्यापक एम.एच. चौधरी हे बाहेरगावी गेले होते त्यांचे रात्रीच्या…

Read Full News
Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांची मुख्यमंत्र्यांवर टिका, ईडी चौकशीची मागणी

हॅलो जनता न्युज, मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुलीने दहावीची परीक्षा दिली नाही, म्हणून ते सागर बंगल्यावरून वर्षावर गेलेले नाहीत, असे सांगितले जात असले तरी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या हक्कासाठी त्यांनी गादीवर बसविले असल्याचे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी म्हटले आहे. “आमच्या हक्काचे आरक्षण तुम्ही आम्हाला देत नाहीत. महाराष्ट्राच्या मुलीत त्यांना त्यांची मुलगी…

Read Full News
India Vs England

India Vs England : भारत आणि इंग्लंड यांच्यात पहिला वनडे सामना सुरू ; भारतासमोर 249 धावांचं आव्हान !

हॅलो जनता, मुंबई : India Vs England : या सामन्यात नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने लागला आणि त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने 50 षटकात सर्व गडी गमवून 248 धावा केल्या, ज्यामुळे भारताला विजयासाठी 249 धावांचं लक्ष्य देण्यात आलं. आता भारताच्या खेळाडूंच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. या सामन्यात विराट कोहली दुखापतीमुळे खेळत नाही. तर,…

Read Full News
Raver

Raver : शेतकऱ्याच्या दुचाकीच्या डिक्कीतून ३ लाखांची चोरी ; गुन्हा दाखल !

हॅलो जनता न्युज, रावेर : रावेर (Raver) तालुक्यातील खिरवड येथील एका शेतकऱ्याच्या दुचाकीच्या डिक्कीतून सुमारे ३ लाख रुपये अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना ३ रोजी दुपारी रावेर येथे घडली. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. रावेर (Raver) तालुक्यातील खिरवड येथील भिका दलपत प्रजापती यांनी रावेरमधील देशमुख प्लॉटमधील आयडीबीआय बँकेतून शेती कामासाठी सुमारे ३…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION