Headlines

जनसेवक बंडू सोनार नगरसेवक व्हावे यासाठी रामेश्वरम येथे देवाला साकडे, जय सोमवंशी व तरुणांचा पुढाकार

हॅलो जनता, पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा शहरातील प्रभाग क्रमांक ८ मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून निष्कलंक आणि निस्वार्थपणे कार्यरत असलेले जनसेवक बंडूभाऊ केशव सोनार यांच्याबाबत जनतेमध्ये विशेष उत्साह आणि आदर निर्माण झाला आहे. कोणतेही पद किंवा राजकीय प्रतिष्ठा न बाळगता समाजाच्या हितासाठी झटणारे बंडू सोनार यांचे कार्य आता अधिकच गाजत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रभागातील नागरिक, विशेषतः…

Read Full News

विद्यापीठाच्या परिसर मुलाखतीत सात विद्यार्थ्यांची निवड, कुलगुरूंनी दिल्या शुभेच्छा…

हॅलो जनता, जळगाव दि. २६ (प्रतिनिधी) – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी संस्थेतील सात विद्यार्थ्यांची परिसर मुलाखतीमध्ये निवड झाली असून कुलगुरू प्रा व्ही. एल. माहेश्वरी यांच्या हस्ते त्यांना आज नियुक्तीपत्रे देण्यात आली. विद्यापीठाच्या केंद्रीय प्रशिक्षण व नियुक्ती कक्षाअंतर्गत युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी येथे बी. टेक केमिकल इंजिनिअरिंग च्या…

Read Full News

पाचोरा बाजार समितीकडून शेतमाल तारण कर्ज वितरण; २ लाखांचा धनादेश वितरित

हॅलो जनता पाचोरा, ता. २४ जून  अवकाळी पावसामुळे व बाजारातील प्रतिकूल परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतमाल तारण कर्ज योजना प्रभावीपणे राबवण्यास सुरुवात केली आहे. या योजनेअंतर्गत आज शेतकरी अनिल विश्वासराव पाटील (रा. पाचोरा) यांना २ लाख रुपयांचा धनादेश बाजार समितीच्या…

Read Full News

मैत्रेय कंपनीच्या गुंतवणूकदारांना न्याय मिळणार, आमदार किशोर पाटील यांच्या पाठपुराव्यानंतर शासनाची ठोस कारवाई सुरू…

हॅलो जनता प्रतिनिधी मुंबई / जळगाव –  जळगाव जिल्ह्यातील आणि राज्यातील हजारो गुंतवणूकदारांची मैत्रेय ग्रुप मध्ये फसवणूक झाल्यानंतर गुंतवणूकदारांनी न्याय मिळावा यासाठी आमदार किशोर पाटील यांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू होता. अनेक ठेवीदारांनी आमदार किशोर पाटील यांची भेट घेऊन न्यायाची मागणी केली होती. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार किशोर पाटील यांनी तत्काळ गृह मंत्रालयाकडे पत्र…

Read Full News

निरोप समारंभ ; सर्व कर्मचारी शेतकऱ्यांची एकच भावना “असा अधिकारी होणे नाही”

हॅलो जनता, प्रतिनिधी – पाचोरा तालुक्यात कृषी विभागाच्या योजना आणि शेतकऱ्यांना उत्तम मार्गदर्शन करणारे कर्तव्य दक्ष तालुका कृषी अधिकारी श्री. रमेश निना जाधव यांची प्रशासकीय कारणास्तव तालुका कृषी अधिकारी, जळगाव जामोद या ठिकाणी बदली झालेली आहे. त्या कारणाने तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने श्री. रमेश निना जाधव यांच्या निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या…

Read Full News

पाचोरा मतदारसंघातील माजी आमदार दिलीप वाघ यांचा भाजपात जाहीर प्रवेश, प्रवेशाच्या वेळी नेमके काय घडले..

हॅलो जनता, मुंबई | 27 मे 2025 भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात आज एक महत्त्वपूर्ण राजकीय घडामोड घडली. पाचोरा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार श्री. दिलीप वाघ यांनी आपल्या असंख्य समर्थक कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीमध्ये अधिकृत प्रवेश केला. या प्रवेशामुळे उत्तर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे. या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष…

Read Full News

गांजाची तस्करी उधळली : चोपडा पोलिसांची मोठी कारवाई

चोपडा, दि. २७ मे २०२५ – चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या पथकाने गांजाची मोठ्या प्रमाणावर तस्करी उधळत एकास अटक केली असून सुमारे २.३० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक श्री. मधुकर साळवे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, आज सकाळी १० वाजता बोपडा चुंचाळे रोडवरील एम.एस.डब्ल्यू. कॉलेजजवळ सापळा रचण्यात आला. चुंचाळेकडून चोपड्याकडे येणाऱ्या एमपी…

Read Full News

चाळीसगावकरांना त्रास देणारी ‘शांताबाई’ अखेर पोलिसांच्या जाळ्यात …

हॅलो जनता, चाळीसगाव :  सोशल मीडियावर ‘शांताबाई’ या नावाने बनावट अकाऊंट तयार करून चाळीसगावातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या नावाने बदनामी करणाऱ्या ‘शांताबाई’ फेम तरुणाला अखेर नाशिक येथील सायबर क्राइम ब्रँचच्या पथकाने शहर पोलिसांच्या मदतीने सोमवारी रात्री ताब्यात घेतले आहे. या कारवाईने तालुक्यात एकच खळबळ उडाली असून ही व्यक्ती कोण ? त्याला पाहण्यासाठी शहर पोलिसांत गर्दी उसळली होती….

Read Full News

सैनिकांसाठी साखरपुड्यातून मदतीचा हात, जळगावच्या प्रियंका पाटील यांचा स्तुत्य उपक्रम

हॅलो जनता, जळगाव(नितीन गोसावी) :-  राष्ट्रसेवेचा वारसा हा फक्त गणवेशापुरताच मर्यादित न ठेवता, तो जीवनपद्धती म्हणून जपणारे आणि पुढील पिढीकडे सुपूर्त करणारे माजी सैनिक प्रविण संतोष पाटील (रा. शिवराणा नगर, पिंप्राळा) यांनी एक अनोखा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या कन्या चि. सौ. कां. प्रियंका यांचा साखरपुडा ११ मे २०२५ रोजी पार पडला. या समारंभात आलेली…

Read Full News
Jalgaon Crime

बिग ब्रेकिंग : आरोग्य विभागातील लाचखोर अधिकारी एसीबीच्या ताब्यात, तर बड्या अधिकाऱ्याची चौकशी सुरु

हॅलो जनता न्युज, जळगाव जळगाव येथील जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागात आज दुपारी तक्रारदारकडून लाचखोरीची तक्रार प्राप्त झाल्यानंतर जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीवरून सापळा लावला. एका आरोग्य अधिकाऱ्याला १५ हजार रुपयांची लाच घेताना ताब्यात घेण्यात आले आहे. तर इतरांची बड्या अधिकाऱ्याची कडून चौकशी सुरु असून संबंधित अधिकारी हा एसीबी च्या कार्यालयात चौकशी साठी येऊन बसल्याचे देखील…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION