सामाजिक कार्यकर्ते सचिन धांडे यांची महाराष्ट्र राज्य अन्न आयोगावर नियुक्ती
हॅलो जनता, जळगाव : सामाजिक चळवळीत सक्रीय असलेले आणि आदिवासी, शेतकरी, वंचित घटकांच्या हक्कासाठी दीर्घ काळ संघर्ष करणारे सचिन धांडे यांची नुकतीच महाराष्ट्र राज्य अन्न आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती राज्य शासनाच्या निर्णयानुसार अन्न सुरक्षा अधिकार कायदा २०१३ अंतर्गत करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य अन्न आयोग हे राज्यातील गोरगरीब, भूमिहीन, भटकंती, स्थलांतरित…
