💥 ब्रेकिंग : बसचा भीषण अपघात, पहाटे पुलाचे बॅरिकेट तोडून बस नदीत कोसळली.
हॅलो जनता न्यूज, जळगाव – इंदूरहून जळगावच्या दिशेने येणारी एक खासगी लक्झरी बस रविवारी (६ जुलै) पहाटेच्या सुमारास भीषण अपघातग्रस्त झाली. आमोदा गावाजवळील नदीवरील पुलावर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बस थेट नदीपात्रात कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला असून सुमारे २५ प्रवासी जखमी झाले आहेत. प्राप्त प्राथमिक माहितीनुसार, इंदूरवरून भुसावळमार्गे जळगावकडे येणारी एमपी 09-9009 क्रमांकाची…
