Headlines

💥 ब्रेकिंग : उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर वर्णी, भाजपचा मोठा निर्णय

हॅलो जनता न्यूज, मुंबई | १३ जुलै २०२५ : देशातील नामवंत आणि कडक स्वरूपात गुन्हेगारांना शिक्षा सुनावणारे प्रसिद्ध सरकारी वकील *उज्ज्वल निकम* यांची राज्यसभेसाठी निवड करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाकडून त्यांना राज्यसभेवर पाठवले जाणार असल्याची अधिकृत घोषणा झाली असून, महाराष्ट्रातून हा एक महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे. गुन्हेगारी विरोधातील लढ्यात अग्रभागी असलेले निकम आता…

Read Full News

💥 ब्रेकिंग : विद्यार्थ्याचे मृत्युप्रकरण : वैद्यकीय अहवालात मृत्यूचे धक्कादायक कारण आले समोर…

हॅलो जनता न्यूज, जळगाव : शहरातील आर. आर. विद्यालयामध्ये कल्पेश वाल्मीक इंगळे (१५, रा. रचना कॉलनी) या विद्यार्थ्याच्या मृत्युप्रकरणी त्याच्या वर्गमित्राविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात संस्थाध्यक्ष, मुख्याध्यापक, वर्गशिक्षिका यांनी दिशाभूल केली असून, त्यांच्याविरुद्धही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाइकांनी केली आहे. कल्पेशच्या डोक्याला दुखापत झाली असल्याचे शवविच्छेदन…

Read Full News

💥 ब्रेकिंग : शाळेच्या मैदानावर नववीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू; मारहाणीचा संशय, नातेवाईकांचा आरोप

हॅलो जनता न्यूज, जळगाव :- शहरातील नामांकित रावसाहेब रूपचंद विद्यालय (आर.आर. विद्यालय) मध्ये दुपारी घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने संपूर्ण जळगाव शहरात खळबळ उडाली आहे. शाळेच्या मैदानावर खेळत असताना नववीत शिकणाऱ्या कल्पेश वाल्मिक इंगळे (वय १५) या विद्यार्थ्याचा अचानक मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. नेहमीप्रमाणे सकाळी शाळेत आलेला कल्पेश दुपारच्या सुट्टीत मैदानात इतर विद्यार्थ्यांसोबत खेळत…

Read Full News

💥 ब्रेकिंग : महिला बचत गटांसाठी ‘बहिणाई मार्ट’, पाचोऱ्यात भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन

हॅलो जनता न्यूज, पाचोरा (अवी पाटील) : येथील महिला बचत गटांच्या उत्पादनांना हक्काचे मार्केट मिळावे या हेतूने जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सुमारे १ कोटी ४९ लाख रुपये खर्च करून उभारण्यात येणाऱ्या *‘बहिणाई मार्ट’* या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन उद्या शनिवार, दि. १२ जुलै २०२५ रोजी सकाळी १० वाजता आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते पार पडणार आहे. हा…

Read Full News

जिल्ह्यात पुन्हा गोळीबाराचा थरार : मनुदेवी फाट्याजवळ हॉटेल मालकावर गोळीबार

हॅलो जनता न्यूज, यावल, ता.११ जुलै – यावल तालुक्यातील चिंचोली गावाजवळील मनुदेवी फाट्याजवळ* असलेल्या हॉटेल रायबा येथे संध्याकाळी घडलेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. अज्ञात हल्लेखोरांनी हॉटेलच्या मालकावर गोळ्या झाडल्याने ते गंभीर जखमी झाले असून त्यांना तत्काळ जळगाव येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. गोळीबार घटनेने खळबळ, प्राथमिक माहिती नुसार… प्राप्त माहितीनुसार, हॉटेल रायबा…

Read Full News

मागासवर्गीय कर्मचारी महासंघाची नवीन कार्यकारिणी जाहीर, अरुण सपकाळे यांची कार्याध्यक्षपदी फेरनिवड

हॅलो जनता न्यूज, जळगाव (प्रतिनिधी) – नागपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या मागासवर्गीय कर्मचारी महासंघाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यामध्ये कार्याध्यक्षपदी अरुण सपकाळे यांची फेरनिवड करण्यात आली असून, त्यांच्या नेतृत्वावरील विश्वास पुनश्च अधोरेखित करण्यात आला आहे. तसेच, कोषाध्यक्षपदी राजू रतन सोनवणे यांचीही फेरनिवड करण्यात आली आहे. सह सचिवपदी जयंत सोनवणे व सुभाष पवार…

Read Full News

💥ब्रेकिंग : क्रिकेट विश्वात खळबळ, या भारतीय क्रिकेटरला होणार दहा वर्षाचा कारावास….

हॅलो जनता न्यूज, नवी दिल्ली :- भारतीय क्रिकेटपटू यश दयाल मोठ्या अडचणीत सापडला असून, त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ६९ अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आली आहे. आयपीसीचे हे कलम अजामीनपात्र असून, या कलमाअंतर्गत यश दयालला १० वर्षांची शिक्षादेखील होऊ शकते. या बातमीमुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार पीडित मुलीने यश…

Read Full News

💥ब्रेकिंग : उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णकांत पिंगळे यांची बदली

हॅलो जनता न्यूज, भुसावळ । भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून गेल्या २६ महिन्यांपासून कार्यरत असलेले कृष्णकांत पिंगळे यांची गृहमंत्रालयाकडून बदली करण्यात आली असून त्यांची पुणे येथील अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या उपायुक्तपदी पदोन्नती झाली आहे. भुसावळ येथे कार्यरत असताना श्री. पिंगळे यांनी पोलीस प्रशासनामध्ये नवसंजीवनी दिली. त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसाठी विविध उपक्रम राबवून त्यांचा उत्साह वाढवण्यासह…

Read Full News

पाचोरा पोलिस स्थानकात पोलिस निरीक्षकपदी राहुलकुमार पवार यांची नियुक्ती, तालुक्यात कायदा सुव्यवस्था राखण्याचे आव्हान…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा : काही दिवसांपूर्वी पाचोरा बस स्थानक परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणी पोलीस निरीक्षक अशोक पवार यांची तडका फडकी बदली करून त्यांच्या जागी पाचोरा पोलीस स्थानकाच्या पोलीस निरीक्षक पदी राहुलकुमार पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अनुभवी आणि विविध गुन्हे अन्वेषण विभागांमध्ये यशस्वी सेवा बजावलेले राहुलकुमार पवार यांची पाचोरा येथे पोलिस निरीक्षक म्हणून…

Read Full News

💥 धक्कादायक : जिल्ह्यात तब्बल ८६ बोगस डॉक्टर, बोगस डॉक्टरांचा रुग्णांच्या जीवाशी खेळ…

हॅलो जनता न्यूज, नाशिक : जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा प्रश्न गंभीर बनला असून, गेल्या वर्षभरात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने ८६ बोगस डॉक्टरांविरोधात कारवाई केली आहे. यापैकी ३२ जणांवर पोलिसांत एफआयआर दाखल केले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे इगतपुरी शहारत ही संख्या सर्वाधिक ३६ आहे. तालुक्यातील शिरसाठे येथे सहा महिन्यांपूर्वी एक बोगस डॉक्टर आढळल्यानंतर हा मुद्दा ऐरणीवर आला…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION