Headlines

नालबंदी येथे अचानक पुराचा कहर ; शिक्षक इम्तियाज खान यांची थरारक सुटका, ग्रामस्थांच्या धाडसाने टळला मोठा अनर्थ.

भडगाव प्रतिनिधी : यशकुमार पाटील. भडगाव : तालुक्यातील नालबंदी येथे आज सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे अचानक पूरस्थिती निर्माण झाली. गावाजवळील के.टी. वेअर आणि परिसरातील नाल्यांना आलेल्या प्रचंड पाण्यामुळे पुराचे पाणी काही क्षणांत शाळेच्या परिसरात शिरले. या वेळी शाळेत उपस्थित असलेले शिक्षक इम्तियाज खान हे पुराच्या पाण्यात अडकले. मात्र ग्रामस्थांच्या प्रसंगावधान, धाडस आणि तत्परतेमुळे त्यांची सुखरूप…

Read Full News

चाळीसगावात महाविकास आघाडीच्या वतीने प्रतिकात्मक अंतयात्रा काढून सरकारचा निषेध

हॅलो जनता, प्रतिनिधी – मालवण मध्ये राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा झालेल्या अपमान आणि आज महायुती सरकारने राज्यात अनेक ठिकाणी केलेल्या आंदोलनाच्या निषेधार्थ जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे महाविकास आघाडीच्या माध्यमातून सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी टरबूज फोडून महायुती सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला. चाळीसगाव शहरातून वाजत गाजत ही अंत्ययात्रा काढत सरकारचा…

Read Full News

🛑 भुसावळ : नात्याला काळीमा फासणारी घटना, अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार…

हॅलो जनता न्यूज, भुसावळ – नाशिक येथील एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच मावशीच्या पतीने, म्हणजेच तिच्या काकाने, लैंगिक अत्याचार केल्याची एक धक्कादायक घटना भुसावळ शहरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली असून, न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पीडित मुलगी नाशिक येथे शिक्षण घेत असून, तिच्या आई-वडिलांमधील कौटुंबिक…

Read Full News

आमदार किशोर पाटील यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट, सागर बंगल्यावर मिळाला गणपती बाप्पाच्या आरती मान

हॅलो जनता, जळगाव – पाचोरा भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांनी भाजपचे वरिष्ठ नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या मुंबई येथील सागर निवासस्थानी भेट घेतली. यावेळी सागर बंगल्यावर स्थापना केलेल्या गणपती बाप्पाच्या आरतीचा मान आमदार किशोर पाटील यांना मिळाला. तसेच पाचोरा भडगाव मतदार संघातील विविध मुद्द्यांवर आमदार किशोर पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी…

Read Full News

दुष्काळ जाहीर ; आता पंचनामे आणि मदतीच्या अंमलबजावणीची परीक्षा !

जळगांव : खरीप हंगामात पावसाने ओढ दिल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असताना राज्य शासनाने २५ सप्टेंबर २०२६ रोजी राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळाचा ‘ट्रिगर-१’ लागू केला आहे. यामध्ये जळगांव जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यांचा समावेश आहे. एरंडोल, पारोळा, धरणगाव, चोपडा, पाचोरा, जामनेर, जळगाव, भडगाव, अमळनेर, रावेर, चाळीसगाव, भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर आणि यावल हे तालुके…

Read Full News

Jalgaon : गुणवत्तापूर्ण उपक्रमांवर भर देणार – सौ. उषा जैन

हॅलो जनता : (Jalgaon) ‘संख्यात्मकदृष्ट्या विचार न करता गुणवत्तापूर्ण उपक्रमावर भर देणार असून इनर व्हिल क्लबच्या अध्यक्षपदामुळे जबाबदारी वाढली आहे. आज पहिल्याच दिवशी सायकल वाटप, आर्थिकदृष्ट्या आवश्यकता असणाऱ्या विद्यार्थ्यासाठी शैक्षणिक मदत करण्याची घोषणा त्यांनी केली. इनर व्हिल क्लब ऑफ जळगाव जिल्हा ३०३ चा आज (ता.५) ला हॉटेल नैवेद्य येथे पदग्रहण सोहळा सौ. निशा जैन यांच्या…

Read Full News
अजित पवार संवाद

💥 ब्रेकिंग : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पोलिस उपअधीक्षक अंजली कृष्णा यांच्यात नेमके काय घडलं?

हॅलो जनता न्यूज, जळगाव – सोलापूर जिल्ह्यातील कुर्डू (करमाळा तालुका) गावात रस्त्याच्या कामासाठी अवैध मुरूम उत्खननाचा तपास सुरू होता. या कारवाईचे नेतृत्व पोलिस उपअधीक्षक अंजली कृष्णा करत होत्या. त्यावेळी NCP कार्यकर्ते व स्थानिकांनी हस्तक्षेप केला. त्या वेळेस “बाबा जगताप” या कार्यकर्त्याने उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन लावून अधिकारीच्या हातात फोन सोपवला. या फोन कॉलमध्ये अजित पवारांनी…

Read Full News

Burning Car : उभ्या कारने घेतला पेट, सोडा प्यायला थांबले अन् थोडक्यात बचावले

हॅलो जनता न्युज, जळगाव (burning car) मुंबई नागपूर महामार्गावर जळगाव जिल्ह्यातील तरसोद फाट्यानजीक उड्डाणपुलाखाली उभ्या असलेल्या एका कारने (burning car) अचानक पेट घेतल्याने ती पूर्णपणे जळाली. कारमधील दोघेजण सोडा पिण्यासाठी खाली उतरले आणि त्याच वेळी कारने पेट घेतला. त्यामुळे सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. ही घटना सोमवारी संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. विकास शांताराम नूरकर…

Read Full News

एरंडोल येथील अष्टविनायक नगरात हळदी कुंकवाचा व पीएम विश्वकर्मा योजनेचा कॅम्प संपन्न

हॅलो जनता न्युज, एरंडोल : एरंडोल येथील अष्टविनायक मंदिरात दिनांक 22 जानेवारी 2025 रोजी, हळदी कुंकवाचा व पीएम विश्वकर्मा योजनेच्या लाभाबाबत कॅम्प आयोजित करण्यात आला होता. यामध्ये महिलांसाठी गिफ्ट वितरणाचे आयोजनही करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात गणपती आरती आणि शंकराची आरती मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती होती, ज्यात एरंडोल आमदार मृणाली अमोल…

Read Full News

रावेर तालुक्यात वादळी वाऱ्याचा कहर : केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

रावेर, ता. ३० जून — रावेर तालुक्यात रविवारी रात्रीच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. काही भागांत वादळी वाऱ्यासोबत हलक्या प्रमाणात पावसानेही हजेरी लावली. मात्र, वाऱ्याच्या तीव्रतेमुळे अनेक शेतांतील केळीची झाडे जमीनदोस्त झाली असून, शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील वर्डी, अभोडे, सावदा, निंभोरा, ऊमळदा, कासोदा, उंबरखेड, आंधळे…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION