हॅलो राजकारण

Imtiyaz Jaleel : एमआयएम चे खासदार इम्तियाज जलील करणार करण पवारांचा प्रचार

हॅलो जनता (जळगाव) – जळगाव लोकसभा मतदारसंघ प्रचाराला सुरुवात झाली असून हा विकास आघाडी आणि महायुती मध्ये चांगली चुरस पाहायला मिळत आहे याच पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर येत असून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील हे महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार पाटील यांच्या प्रचारासाठी जळगाव सभा घेणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

माजी खासदार उन्मेष पाटील हे भाजपचे खासदार, आमदार असूनही आमची चांगली मैत्री होती. तिकीट कापल्यानंतर मी उन्मेषला फोन करून सांगितले की, तुझा उद्या काहीही निर्णय असला तरी मी तुला मदत करायला तयार आहे. अगदी तुझ्या प्रचाचालाही येऊ शकेल, असे वक्तव्य एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी एका पत्रकार परिषदेत केले.

त्यामुळे जलील (Imtiyaz Jaleel) यांच्या भूमिकेचे जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात नेमके काय राजकीय पडसाद उमटतात? नेमका लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय परिणाम होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार असून यावर भाजप काय बोलणार? हे बघणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

MVA Jalgaon : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करत धरणगावात करण पवार पाटील यांच्या प्रचाराला सुरवात

Megha Recharge Project : लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे दहा वर्षापासून केळी उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय, अरुणभाई गुजराथी यांनी खासदारांना सुनावले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button