हॅलो राजकारण

Jalgaon Loksabha : “भाजपवाले मदत करो नको करो आम्ही मदत करणार” पालकमंत्र्यांच्या वक्तव्यावर गिरीश महाजन म्हणाले….

हॅलो जनता (जळगाव) – जळगाव लोकसभा (Jalgaon Loksabha) निवडणुकीत प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून मेळावे प्रचार रॅली जोरात सुरू आहेत. यात महायुतीच्या घटक पक्षाकडून आता एकमेकांना कोपरखळ्या सुरू आहेत. पाचोरा येथे आयोजित महायुतीच्या मेळाव्यात बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी ‘आम्ही एका बापाची अवलाद आहोत आम्हाला विधानसभेत भाजप मदत करो नको करो, आम्ही या लोकसभेत प्रामाणिकपणे सर्व शिवसैनिक काम करणारा आहोत असं वक्तव्य केल्याने पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले होते.

त्यावर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया आम्ही सगळे सोबत आहोत महायुतीतील सर्व घटक पक्ष सोबत काम करत आहोत. लोकसभेची निवडणूक आम्ही एकमताने एक दिलाने लढवत आहोत तसेच पुढच्या विधानसभा निवडणुका 100% ताकदीने लढणार असून जळगाव जिल्ह्यात एकच आमदार काँग्रेसचा आहे तो देखील निवडून येणार नाही सर्व जागा आमच्या निवडून येतील असा विश्वास व्यक्त करत गिरीश महाजन यांनी वेळ मारून नेली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर नेमके विधानसभा निवडणुकीत काय घडते याकडे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Devendra Fadanvis : उद्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर, भुसावळ मध्ये जाहीर सभेचे आयोजन

Jalgaon Loksabha : जळगाव ग्रामीण मतदारसंघ आम्ही अबाधित ठेवणार, पालकमंत्री गुलाबराव पाटील आजपासून प्रचारात सक्रिय

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button