हॅलो जनता न्यूज, जळगाव (प्रतिनिधी) : लखनऊ वरून मुंबई कडे जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेस रेल्वेच्या एका स्लीपर कोचमध्ये आज दुपारी अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र प्रवाशांची सतर्कता आणि रेल्वे कर्मचाऱ्यांची वेळीच घेतलेली तातडीची कारवाई यामुळे मोठा अनर्थ टळला. भुसावळ रेल्वे स्थानकावरून जळगाव कडे येत असताना भादली रेल्वे स्थानकाजवळ हा प्रकार घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गाडी जळगाव स्थानककडे येत असताना बोगी नंबर ४ च्या स्लीपर डब्यातील चाकाजवळ अचानक धूर येऊ लागला. धूर मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे पाहताच प्रवाशांनी तात्काळ ओरडून इतरांना सावध केले. या घटनेमुळे काही काळ गाडीत धावपळ उडाली. तातडीने रेल्वे कर्मचाऱ्यांना याची माहिती देण्यात आली. यानंतर कर्मचाऱ्यांनी तातडीने गाडी थांबवून आग विझवण्याची मोहीम राबवली. अग्निशामक सिलिंडरच्या मदतीने आग विझवण्यात यश आले. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रवाशाला इजा झाली नाही.
पुष्पक एक्सप्रेस: ब्रेक लायनर घासल्याने आग लागल्याची माहिती…
प्राथमिक माहितीनुसार, संबंधित बोगीच्या चाकाचा लायनर घासल्याने स्पार्क निर्माण झाला आणि त्यातून आग लागली, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. रेल्वेच्या तांत्रिक कर्मचाऱ्यांनी तातडीने तपासणी करून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. घटनेनंतर गाडीला काही वेळ थांबवून सुरक्षिततेची खात्री करण्यात आली असून, प्रवाशांच्या जीविताला कोणताही धोका नसल्याने पुष्पक एक्सप्रेस मुंबई कडे रवाना करण्यात आला आहे.
मात्र या घटनेमुळे २० ते २५ मिनिटे गाडी भादली रेल्वे स्थानकानजीक थांबून होती. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र प्रवासी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे प्रवाशांनी दिलासा व्यक्त केला आहे. काहीवेळाने गाडीची तपासणी केल्यानंतर पुष्पक एक्सप्रेस पुढील प्रवासाला रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या…
🚨 ब्रेकिंग : चाळीसगाव अपघात, इको-आयशरची समोरासमोर जोरदार धडक, आठ भाविक जण जखमी
💥Big Breaking : अरुण भाई गुजराथी हातात कमळ घेणार की घड्याळ बांधणार, राजकीय चर्चांना उधाण…
