हॅलो सामाजिकहॅलो राजकारण

Jalgaon : आषाढी एकादशीनिमित्त शरद पवारांच्या राष्ट्रवादी कडून शासकीय रुग्णालय फळे वाटप

हॅलो जनता : (Jalgaon) आज आषाढी एकादशीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष महानगर जळगाव तर्फे शासकीय वैदयकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव (Jalgaon) येथील गोर गरीब रुग्ण व त्यांचा नातेवाईकांना केळी सफरचंद यासह अन्य फळांचे वाटप करण्यात आले. दरवर्षी हा उपक्रम राबविण्यात येत असून याचा अनेक रुग्णांना फायदा होत असून सदरचे वर्ष हे शेतकरी वर्ग व सामान्य नागरिकांसाठी भरभराटीचे जावो असे साकडे विठ्ठला कडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे घालण्यात आले.

या वेळेस महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी , सरचिटणीस सुनीलभैय्या माळी , राष्ट्रवादी युवक महानगर अध्यक्ष रिकू चौधरी , महानगर जिल्हाउपअघ्यक्ष किरण राजपूत , राष्ट्रवादी अल्पसंख्यक महानगर जिल्हाअघ्यक्ष डॉ रिझवान खाटीक , राष्ट्रवादी युवक महानगर सरचिटणीस हितेश जावळे , महानगर जिल्हासरचिटणीस रहिमभाई तडवी , महानगर जिल्हासरचिटणीस सुहास चौधरी , नितीनभाऊ मोरे , महानगर चिटणीस नईम खाटीक , कार्यालय मंत्री राहुल टोके आदी उपस्थित होते.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Pandharpur : बा विठ्ठला… बळीराजाला सुखी ठेव, कष्टकऱ्यांच्या व सामान्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे… मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे

Chess Competition : जळगाव जिल्हा खुल्या बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धा संपन्न

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button