Malnutrition: धक्कादायक : यावल तालुक्यात आढळली १७ कुपोषित बालके…
हॅलो जनता न्युज, यावल :
यावल ग्रामीण रुग्णालयात गुरुवारी तालुकास्तरीय कुपोषित (malnutrition) बालकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात यावल शहर आणि तालुक्यातील ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान १७ बालके कुपोषित (malnutrition) असल्याचे आढळले.
शिबिरात बालकांच्या पालकांना कुपोषण मुक्ततेसाठी उपाययोजना व सकस आहार देण्याच्या पद्धतींबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. कुपोषणमुक्त (malnutrition) बालक घडविण्यासाठी योग्य आहार आणि जीवनशैली कशी असावी, यावर तज्ज्ञांनी पालकांशी संवाद साधला.
शिबिराचे आयोजन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय कुरकुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. बालरोग तज्ज्ञ डॉ. प्रशांत जावळे, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली निकुंभ, डॉ. कमलेश पाटील आणि डॉ. शबाना तडवी यांनी बालकांची तपासणी केली.
Bogus companies : महाराष्ट्र बोगस कंपन्यांमध्ये आघाडीवर तर दिल्ली दुसऱ्या स्थानावर
Bike Chori : परजिल्ह्यातील अट्टल दुचाकी चोरटा एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात, चोरीच्या 5 दुचाकी हस्तगत
Dr. Ashok Uike : ब्रेकिंग : आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर