जिल्हा क्रीडा स्पर्धेत आयटीआय जळगाव अव्वल स्थानी

हॅलो जनता न्युज, जळगाव :
जिल्ह्यातील आयोजित क्रीडा स्पर्धांमध्ये शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगावच्या सर्वच संघांनी विजयी होऊन उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे.
जिल्हा स्तरावरील विभागीय क्रीडा स्पर्धांसाठी विजेते संघ पुढीलप्रमाणे:
हॉलीबॉल (मुलांचा संघ) – शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव
खो-खो (मुलांचा संघ) – शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव
खो-खो (मुलींचा संघ) – औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव
बॅटमिंटन (मुलींचा संघ) – शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव
400 मीटर धावणे (मुलांचा संघ) – औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव
क्रिकेट (मुलांचा संघ) – फायनल विजेता, आयटीआय जळगाव
महिला क्रिकेट (महिला संघ) – आयटीआय महिला टीम, जळगाव
वरील सर्व संघांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे. संस्थेचे प्राचार्य संतोष साळुंखे, गटनिदेशक नितिन चौधरी सर आणि सर्व कर्मचारी बंधूंनी विजयी संघांचे अभिनंदन केले आहे. संस्थेतील सर्व शिल्पनिर्मिती आणि कार्यालयीन कर्मचार्यांनी परिश्रम घेतले, ज्यामुळे ही विजयश्री मिळवता आली.
Amalner : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; १०-१२ जणांना चावा