हॅलो राजकारण

🛑 राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर…

हॅलो जनता न्यूज, जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, या दौऱ्यात ते जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची रणनीती ठरविणे, संघटनात नवीन उत्साह निर्माण करणे आणि कार्यकर्त्यांना दिशा देणे यासाठी ही बैठक घेण्यात येणार आहे.

जळगाव शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयात या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील पदाधिकारी, कार्यकर्ते, युवा नेते आणि महिला आघाडीच्या प्रतिनिधींना या बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

🛑 राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर...
🛑 राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर…

प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षाच्या ताकदीचा आढावा घेण्यात येईल तसेच निवडणुकीसाठी स्थानिक पातळीवर कोणत्या ठिकाणी अधिक संघटनबांधणीची गरज आहे यावरही चर्चा होणार आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला अधिक बळकटी देण्यासाठी विविध कार्यक्रम राबविण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वाची ठरणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात येत आहे.

बैठकीला जिल्ह्यातील माजी आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, तसेच विविध आघाड्यांचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने दमदार कामगिरी करावी, यासाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचे मार्गदर्शन जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना लाभणार आहे.

इतर महत्वाच्या बातम्या…

🛑स्थानिक गुन्हे शाखा : बोकड व बकरी चोरी प्रकरणातील तिघे आरोपी जेरबंद

🛑 Central Railway : मध्य रेल्वेकडून प्रवाशांसाठी महत्वाची घोषणा, दिवाळी आणि छठसाठी…

🛑 Shetkari Yojana २०२५ : रब्बी हंगामाच्या या योजनेसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज प्रक्रिया सुरू…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button