🔴 ब्रेकिंग : गिरणा धरण, सतर्कतेचा इशारा : पाण्याचा विसर्ग वाढविला…

हॅलो जनता न्यूज, चाळीसगाव – पाटबंधारे उपविभाग चाळीसगाव अंतर्गत असलेल्या गिरणा धरण प्रकल्पात येणाऱ्या पाण्याची आवक वाढल्याने धरण प्रशासनाने आज, दि. 27 ऑक्टोबर रोजी सकाळी 8.00 वाजता, पाण्याचा विसर्ग वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
प्राप्त माहितीनुसार, गिरणा प्रकल्पाचा विसर्ग 9,904 क्युसेक्सवरून वाढवून 12,380 क्युसेक्स (सुमारे 350.35 क्युमेक्स) इतका करण्यात आला आहे. सध्या धरणाचे वक्रद्वार क्र. 1, 2, 5 आणि 6 हे प्रत्येकी 60 सेंमी, तर वक्रद्वार क्र. 3 आणि 4 हे प्रत्येकी 30 सेंमी ने उघडे ठेवण्यात आले आहेत.
या निर्णयामुळे गिरणा नदीतील पाण्याचा प्रवाह वाढणार असून, नदीकाठावरील गावांमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पाटबंधारे विभागाने सांगितले की, धरणात येणाऱ्या पाण्याच्या आवकेनुसार विसर्गात पुढे बदल (कमी अथवा वाढ) करण्यात येऊ शकतो.
धरण परिसर आणि खालील गावांतील ग्रामस्थ, शेतकरी तसेच नदीकाठावरील नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. विशेषतः नदीकाठावर जनावरे चारण्यासाठी जाणे, कपडे धुणे किंवा मासेमारी यांसारख्या कामांसाठी जाणे टाळावे, असा इशारा पाटबंधारे विभागाकडून देण्यात आला आहे.
गिरणा प्रकल्प परिसरात गेल्या काही दिवसांपासून सतत होत असलेल्या पावसामुळे धरणक्षेत्रात पाण्याची आवक वाढली असून, धरण भराव क्षमतेच्या जवळ पोहोचले आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने हा विसर्ग वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या…
💥 ब्रेकिंग :जळगाव-पाचोरा रस्त्यावर ट्रॅव्हल्स आणि कारचा भीषण अपघात, प्रवासी जखमी तर…
🚨 ब्रेकिंग : भडगाव नगराध्यक्षपदासाठी भाजपाचा उमेदवार ठरला? यांच्या नावाची चर्चा….




