अमोल भाऊ विकासावर बोला, समाजामध्ये तेढ निर्माण करू नका – शिवसैनिकांचे आव्हान
हॅलो जनता न्यूज, पाचोरा –
पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघात सर्व पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू असून विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक सुरू आहे. मात्र भाजपचे बंडखोर उमेदवार अमोल शिंदे यांच्याकडून विकासावर न बोलता मतदार संघातील दोन समाजात तेढ निर्माण होतील अशी वक्तव्य आणि व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत.
आमदार किशोर पाटील एका सभेत बोलताना हसत मिश्किल पणे बोलले बोलले होते. मात्र उंदराच्या हातात चिंधी लागली तसे भाजपचे बंडखोर उमेदवार अमोल शिंदे यांचे कार्यकर्ते तो अर्धा एडिट केलेला व्हिडिओ व्हायरल करत दोन समाजात तेढ निर्माण करून मतदारसंघाचे वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे अमोल शिंदे यांनी विकासावर बोलावं आपण काय केलं ते सांगावं असे आव्हान शिवसैनिकांनी दिले आहे.
पाचोरा भडगाव मतदार संघातील जनता ही सुज्ञ आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पाचोरा भडगाव मतदारसंघांमध्ये सर्व समाजात एकोपा निर्माण झाला असून सर्व समाज हे सुखदुःखात, उत्सवात सहभागी होत असतात. मात्र फक्त राजकारणासाठी आणि एका विशिष्ट समाजाची मते मिळवण्यासाठी अशा पद्धतीने दोन समाजात तेढ निर्माण करणे योग्य नसल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे.
पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघात प्रचंड विकास कामे झाले असून विरोधकांकडे विकास कामांवर बोलण्यासाठी काहीच नसल्याने सामाजिक स्वास्थ बिघडवण्याचे काम जोरात सुरू आहे. मात्र जनता ही सुज्ञ आहे अशा कुठल्याही अफवांना जनता बळी पडणार नसल्याचं बोललं जात आहे.
Vaishalitai Suryawanshi : आता एकच निर्धार… वैशालीताई सुर्यवंशी बनणार आमदार
Mangesh chavhan : आमदार मंगेशदादा चव्हाण यांचा प्रचाराचा झंझावात; प्रत्येक घरी उस्फुर्त स्वागत