कवयित्री बहिणाबाई शासकीय संस्थेत नेताजी व बाळासाहेब यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम संपन्न !

हॅलो जनता न्युज, जळगाव :
आज, कवयित्री बहिणाबाई चौधरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव येथे नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात संस्थेचे गट निदेशक नितीन चौधरी आणि मुकेश पाटील यांनी दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
कार्यक्रमाला संस्थेतील शिल्प निदेशक महेश सूर्यवंशी, किशोर शिरसाळे, विलास पाटील, प्रदिप औटी, स्वेतल घोगरे, नेमाडे सर तसेच संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एनएसएस स्वयंसेवक व कार्यक्रम अधिकारी रमेश सपकाळ आणि संदीप उगले यांनी विशेष परिश्रम घेतले.
Mumbai Crime : छोटा राजनचा राईट हॅन्ड डी.के. रावला अटक, खंडणीच्या आरोपात मुंबई पोलिसांची कारवाई
एरंडोल येथील अष्टविनायक नगरात हळदी कुंकवाचा व पीएम विश्वकर्मा योजनेचा कॅम्प संपन्न
Nashik : पतंग उडवताना गच्चीवरून पडून ८ वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू!