जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीची आघाडी! शिवसेनेच्या दोन, भाजपच्या एका उमेदवाराची बिनविरोध निवड निश्चित
पारोळा, एरंडोल आणि भुसावळ सोसायटी मतदारसंघांत तीन महिला उमेदवारांची बाजी

जळगाव जिल्हा बँक निवडणूक : महायुतीची आघाडी; ३ जागा बिनविरोध
पारोळा, एरंडोलमध्ये शिवसेनेचे प्रतिनिधित्व
पारोळा सोसायटी मतदारसंघातून माजी आमदार चिमणराव पाटील यांच्या पत्नी नलिनी चिमणराव पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. तर एरंडोल सोसायटी मतदारसंघातून आमदार अमोल पाटील यांच्या पत्नी मृणाल अमोल पाटील यांचीही बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. या दोन्ही निवडींमुळे पाटील कुटुंबांचे जिल्हा बँकेतील राजकीय प्रतिनिधित्व कायम राहणार आहे.
भुसावळमध्ये भाजपला संधी
भुसावळ सोसायटी मतदारसंघातून राज्यमंत्री तथा भाजप नेते संजय सावकारे यांच्या पत्नी रजनीताई संजय सावकारे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. त्यांच्या निवडीमुळे भुसावळ मतदारसंघातून भाजपला संचालकपद मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या तीन जागांवरील बिनविरोध निवडीमुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीने आपले खाते उघडले आहे. आता उर्वरित मतदारसंघांमध्ये कोणते उमेदवार निवडणूक रिंगणात राहतात आणि निवडणुकीचे पुढील चित्र कसे असेल, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.




