उपराष्ट्रपतींच्या दौऱ्यात विविध शासकीय कार्यक्रम, अधिकाऱ्यांसोबत बैठका तसेच सार्वजनिक कार्यक्रमांचा समावेश होता. यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त, वाहतूक व्यवस्थापन आणि इतर विभागांचा समन्वय आवश्यक होता. मात्र दौरा रद्द झाल्याने आता प्रशासन संपूर्णपणे निवडणूक प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करू शकणार आहे.
दरम्यान, दौरा रद्द होण्यामागील नेमके कारण अधिकृतपणे स्पष्ट करण्यात आलेले नसले, तरी निवडणुकीची व्यस्तता आणि प्रशासकीय अडचणी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आल्याचे मानले जात आहे. उपराष्ट्रपतींचा जळगाव दौरा पुढील कालावधीत नव्याने निश्चित केला जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.