जळगावात महायुतीच्या बैठकीत काय घडले?
भाजप सेनेची युती जाहीर करण्यात आलेली आहे. या ठिकाणी जागा वाटपाची चर्चा झालेली आहे, दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी जागा वाटप जाहीर करण्यास नकार दिला आहे. मात्र भाजपच्या नेत्यांनी तडजोड करीत ५७ पेक्षा कमी जागा घेण्यास मान्यता दिली असून शिवसेनेला २५ जागा निश्चीत झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
जळगाव महायुती बैठक : महायुतीची घोषणा
जळगाव येथील हटिल प्रेसिडेंट पार्क येथे भारतीय जनता पक्ष व शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांची बैठक झाली. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील, चंद्रकांत सोनवणे, विष्णू भंगाळे उपस्थित होते. तर भाजपतर्फे खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, मंगेश चव्हाण, दिपक सूर्यवंशी उपस्थित होते. तब्बल दीड तास दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये चर्च झाली, यावेळी दोन्ही पक्षांनी ‘युती करण्याचे घोषीत केले. मात्र जागा वाटपाबाबत सहमती झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे.
राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला मात्र या बैठकीत सहभागी करण्यात आले नाही. दोन्ही पक्षात सहमती इाल्यानंतर भाजपा व शिवसेना यांची युती झाली आहे. त्या दोघांनी चर्चा करून त्यानंतर आमच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांच्या नेत्यांनी कळविले होते. त्यानुसार आमची लवकरच बैठक होईल. सन्मानपूर्वक जागा दिल्यास आम्ही महायुतीत सहभागी होऊ, अन्यथा आम्ही आमच्या इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या असून स्वबळावर लढण्यास तयार असल्याचे माजी मंत्री तथा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते गुलाबराव देवकर यांनी सांगितले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या…
शिष्यवृत्ती परीक्षेत आदर्श कन्या विद्यालयाचे घवघवीत यश
🚨 ब्रेकिंग : पाचोरा एम. एम. महाविद्यालयाची विजयी हॅट्रिक, वादविवाद स्पर्धेत उल्लेखनीय यश…
