Headlines

🚨 ब्रेकिंग: शेवटी “त्या” ज्येष्ठ नेत्याने शरद पवारांची साथ सोडली, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का

हॅलो जनता न्यूज, जळगाव – राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होताच राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांच्या पक्षांतराच्या हालचालींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय माजी विधानसभा अध्यक्ष अरुण भाई गुजराती यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

हा प्रवेश मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. अरुण गुजराती यांच्या या निर्णयाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांतील अंतर्गत समीकरणांना नवा कलाटणी मिळाल्याचे राजकीय वर्तुळात म्हटले जात आहे.

शरद पवार यांचे विश्वासू — आता अजित पवार यांच्या गोटात

अरुण गुजराती हे गेल्या चार दशकांपासून शरद पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या चांगल्या आणि कठीण काळात त्यांनी पवारांसोबत खांद्याला खांदा लावून काम केले. शरद पवार यांनी स्वतः गुजरातींना महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती, ज्यातून त्यांच्या निकटच्या नात्याची साक्ष मिळते. मात्र अलीकडच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फुटीनंतर आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुजराती यांच्यावर कार्यकर्त्यांचा दबाव वाढू लागला. अखेर त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या मतांचा आदर करत अजित पवार यांच्या गटात जाण्याचा निर्णय घेतला.

“मी दोघांमध्ये सँडविच झालो होतो” — अरुण गुजराती**

शरद पवार यांची साथ सोडताना गुजराती भावनिक झाले. त्यांनी म्हटले, “शरद पवार साहेबांसोबत आनंदाचा काळ गेला. ज्यांनी मला मोठे केले ते शरद पवार, आणि ज्यांनी मला पुढे आणले ते माझे कार्यकर्ते. मी या दोघांच्या मध्ये सँडविच झालो होतो. मात्र कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.”

“तुम्ही निर्णय घ्या, नाहीतर आम्ही आमचा मार्ग मोकळा” — कार्यकर्त्यांचा दबाव

गेल्या काही महिन्यांपासून गुजराती यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता होती. राष्ट्रवादीतील फुटीनंतर काही कार्यकर्ते भाजपमध्ये गेले, तर काहींनी इतर पक्षांचा मार्ग धरला. उरलेले कार्यकर्ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा दबाव टाकत होते. कार्यकर्त्यांनी थेट सांगितले “आपण अजित पवार यांच्यासोबत गेलात तर आम्ही तुमच्या पाठीशी राहू. नाहीतर आम्हालाही आमचा मार्ग मोकळा करावा लागेल.”या दबावानंतर अखेर अरुण भाई गुजराती यांनी कार्यकर्त्यांसोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि शरद पवार यांच्या गटाला रामराम ठोकला आहे.

अरुण गुजराती यांचा प्रवेश हा अजित पवार यांच्यासाठी मोठा राजकीय फायदा मानला जात आहे. शरद पवार यांचे विश्वासू सहकारी असलेले गुजराती आता त्यांच्या प्रतिस्पर्धी गटात गेल्याने, राष्ट्रवादीच्या पारंपरिक मतदारसंघात आणि ग्रामीण कार्यकर्त्यांमध्ये नवीन समीकरणे तयार होण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी हा पक्षांतराचा फटका शरद पवार गटासाठी धक्का ठरण्याची चिन्हे राजकीय वर्तुळात दिसू लागली आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या…

🚨 ब्रेकिंग: पाचोरा नगरपालिका निवडणुकीसाठी पहिल्याच दिवशी इतक्या उमेदवारांचे अर्ज

🔴ब्रेकिंग : चोपडा निवडणुकीत नवे राजकीय गणित; शिंदे गट–काँग्रेस युतीच्या चर्चेला उधाण

🚨 ब्रेकिंग: भडगाव पालिका निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज, तहसीलदारांनी दिली महत्त्वाची माहिती….

1,077Popular Reads (Illustrative)
हॅलो जनताही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Designed & Developed by SM SOLUTION