हॅलो जनता न्यूज, भडगाव (यश पाटील) – भडगाव नगर परिषद निवडणुकीच्या तयारीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. तर २४ नगरसेवक अन् नगराध्यक्ष पदासाठी ४३ केंद्रांवर ३८ हजार ३०२ मतदार मतदान करणार आहेत. तसेच निवडणुकीच्या संपूर्ण वेळापत्रकासह प्रशासकीय तयारीची निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार शीतल सोलट यांनी झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली. या पत्रकार परिषदेला निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार शीतल सोलट, सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा मुख्याधिकारी स्वालिहा मालगावे आणि नायब तहसीलदार अनिल भामरे उपस्थित होते.
दरम्यान, भडगाव नगरपरिषदेच्या १२ प्रभागांतील २४ नगरसेवक आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी एकूण ३८ हजार ३०२ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदानासाठी शहरात एकूण ४३ मतदान केंद्रे सज्ज असतील. निवडणूक प्रक्रियेसाठी अत्यावश्यक सेवा पूर्ण करण्यासाठी आणि पाहणीसाठी ६ सेक्टर अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांच्यासाठी ६ वाहने ही अधिग्रहित करण्यात आली आहेत.
भडगाव नगरपालिका निवडणूक : प्रशासन सज्ज…
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी १२ प्रभागांसाठी प्रभागनिहाय प्रत्येक टेबलवर ३ प्रशिक्षित कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. १० ते १७ तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करणे, १८ नोव्हेंबर छाननी, २१ नोव्हेंबरला माघार, २ डिसेंबरला मतदान तर ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.
भडगाव तालुका क्रीडा संकुलात मतमोजणी करण्यात येईल, असे या वेळी सांगण्यात आले. तर मतदान व मतमोजणीसाठी नियुक्त कर्मचाऱ्याचे पहिले प्रशिक्षण १९ नोव्हेंबर रोजी तर दुसरे प्रशिक्षण २९ नोव्हेंबर रोजी घेतले जाईल. तसेच उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करणे सोईचे जावे तसेच लागणारे दाखल्यांची माहिती व्हावी, यासाठी नगर परिषद आवार व बस स्थानक परिसरात बॅनर लावण्यात आले आहेत. शहरात एकही संवेदनाशिल व आदर्श मतदान केंद्र नाही, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार शीतल सोलट यांनी दिली.
इतर महत्वाच्या बातम्या…
🚨 ब्रेकिंग: भडगावात परिवर्तन मेळावा, अंतर्गत गटबाजीचे भाजप नेत्यांसमोर आव्हान
🔴ब्रेकिंग : भडगावात भाजपचा भव्य परिवर्तन मेळावा : विविध पक्षाच्या माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश
