हा मेळावा आज लक्ष्मण भाऊ मंगल कार्यालयात सकाळी दहा वाजता होणार असून, या मेळाव्याला राज्याचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन, खासदार स्मिता वाघ आणि आमदार मंगेश चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या परिवर्तन मेळाव्यात विविध पक्षातील मान्यवर आणि माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. विशेष म्हणजे, शिवसेना (शिंदे गट), अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील, तसेच महाविकास आघाडीतील अनेक नगरसेवक आणि स्थानिक नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
नगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी भाजपकडून घेतलेला हा मेळावा स्थानिक राजकारणाला नवी दिशा देणारा ठरणार असून, पक्षात नव्या दमाचे कार्यकर्ते दाखल झाल्याने संघटन अधिक बळकट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या मेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी केली असून, शहरासह तालुक्यातील कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या…
ब्रेकिंग: पाचोरा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेत उमेदवारांची गर्दी, इतक्या जणांनी दिल्या मुलाखती
जळगाव रेल्वे स्टेशन येथे विद्यार्थी दिन उत्साहात साजरा
पाचोरा ब्रेकिंग : भाजपचा भव्य परिवर्तन मेळावा, शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश
