Headlines

🚨 ब्रेकिंग : चाळीसगाव अपघात, इको-आयशरची समोरासमोर जोरदार धडक, आठ भाविक जण जखमी

हॅलो जनता न्यूज, चाळीसगाव : येथील मालेगाव रस्त्यावरील छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग २११ रस्त्यावरील वीटभट्टीजवळ इको-आयशरची समोरासमोर जोरदार धडक झाली. अपघातात आठ जण जखमी झाले असून, त्यांना एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. हा अपघात अपघाताची माहिती झाला. मिळताच जगद्गुरू रामानंदचार्य व नरेंद्रचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकाचालकांनी तातडीने घटनास्थळावरून जखमींना शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

चाळीसगाव अपघात : ही आहेत जखमी भाविकांची नावे

इको गाडी (एमएच ४१, बीई ७३४०) भाविकांना गडावरून दर्शन करून वाडे (ता. भडगाव) येथे घेऊन जात असताना हा अपघात झाला. समोरून येणाऱ्या आयशर गाडी (एमएच ०४, ईवाय ३२०६) ने समोरून इको गाडीला जोरदार धडक दिली. अपघाता दगा परदेशी (वय ७०), दीपक महाजन (४२), संदीप परदेशी (३५), झुंबरबाई परदेशी (३५), सोनाली परदेशी (३२), राजेंद्र पाटील (५६), किशोर परदेशी (४०), चित्रकिशोर परदेशी (४१, सर्व रा. वाडे, ता. भडगाव) जखमी झाले आहेत.

चाळीसगाव रस्त्यावरील पाण्यामुळे अपघात झाल्याची भाविकांची माहिती

मालेगाव नाका ते शिवनेरी पार्क या भागात रस्ता बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराने रस्त्याच्या कडेला पाण्याचा निचरा होण्यासाठी कच्च्या गटारी केलेल्या होत्या; परंतु रस्त्याच्या कडेला असलेल्या प्लॉटधारकांनी त्या नाल्या बुजविल्यामुळे रस्त्यालाच नाल्याचे स्वरूप तयार झाले. त्यामुळे रस्त्यावरच पाण्याचा प्रवाह सुरू असल्याने एकीकडून दुचाकी व एकीकडून मोठी गाडी जात असताना दुचाकीस्वाराच्या अंगावर ते पाणी उडाले की मोठा वाद उभा राहत असतो. या वाहणाऱ्या पाण्यामुळे गाड्यांचा ब्रेक लागत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे असून, यामुळेच तेथे नेहमी अपघात होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

इतर महत्वाच्या बातम्या…

🚨 Big Breaking : भीषण अपघात : डंपरची कार ला धडक, आई व मुलाचा जागीच मृत्यू तर वडील व लहान मुलगा गंभीर जखमी

💥Big Breaking : अरुण भाई गुजराथी हातात कमळ घेणार की घड्याळ बांधणार, राजकीय चर्चांना उधाण…

💥ब्रेकिंग : बोगस कॉल सेंटर प्रकरण, संशयितांच्या वकिलाचा युक्तिवाद अन् न्यायालयात काय घडले…

835Popular Reads (Illustrative)
हॅलो जनताही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Designed & Developed by SM SOLUTION