हॅलो जनता न्यूज, अहिल्यानगर :- शहरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका ४२ वर्षीय महिलेवर गुंगीचे औषध देत लैंगिक अत्याचार आणि आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी राहुल नारायण मेरगु (रा. कुंभार गल्ली, तोफखाना, अहिल्यानगर) याच्याविरोधात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १९ ऑगस्ट २०२४ पासून ही घटना सुरू झाली होती. जाधव पेट्रोल पंपाच्या मागील एका ठिकाणी पीडित महिलेला भेटण्याचे कारण सांगून आरोपीने बोलावले. त्यानंतर तिला दिलेल्या चहामध्ये गुंगीचे औषध मिसळून तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. इतकेच नव्हे तर त्या घटनेचे अश्लील फोटो काढून ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.
ब्लॅकमेल करताना आरोपीने फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली होती. या भीतीपोटी पीडित महिलेकडून वेळोवेळी एकूण १४ लाख ७४ हजार ८०० रुपये उकळल्याचे सांगण्यात येते. या संपर्ण प्रकाराला कंटाळून शुक्रवारी, ११ जुलै रोजी रात्री ८:३० वाजता पीडित महिलेने अखेर कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर लगेचच गुन्हा नोंदवत आरोपीस अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील करीत आहेत. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या….
💥 ब्रेकिंग : उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर वर्णी, भाजपचा मोठा निर्णय
💥 ब्रेकिंग : विद्यार्थ्याचे मृत्युप्रकरण : वैद्यकीय अहवालात मृत्यूचे धक्कादायक कारण आले समोर…
💥 ब्रेकिंग : शाळेच्या मैदानावर नववीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू; मारहाणीचा संशय, नातेवाईकांचा आरोप
