Headlines

💥 ब्रेकिंग : पाचोरा तालुक्यात पाऊस सुरूच; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

हॅलो जनता न्यूज, पाचोरा, दि. २८ – हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पाचोरा तालुक्यासह परिसरात शनिवारपासून (२७ सप्टेंबर) सुरू झालेला पाऊस रविवारी (२८ सप्टेंबर)ही कायम आहे. थोड्या वेळाच्या विश्रांतीनंतर पावसाचा जोर पुन्हा वाढत असून, शहर व परिसरातील नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत.

या सततच्या पावसामुळे संभाव्य धोका ओळखून प्रशासनाने तातडीने उपाययोजना हाती घेतल्या आहेत. शहरातील नदी-नाले व पाण्याचे मार्ग मोकळे करण्यात आले आहेत. तसेच अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटवून पाण्याचा प्रवाह सुरळीत करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहरातील पाणी निचरा करण्यास मदत झाली आहे.

व्हिडिओ साठी ______👇

https://youtube.com/@hellojanata1993?si=_DA1Q0bBHCQs-npR

प्रशासनाकडून नागरिकांना वेळोवेळी सूचना दिल्या जात असून, सुरक्षिततेसाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पाचोऱ्यात पाऊस सुरू : नागरिकांना प्रशासनाचे आवाहन

  • नदी परिसरात जाणे टाळा – पाण्याचा जोर वाढल्यामुळे नदी-नाले परिसर धोकादायक आहेत.
  • सुरक्षित स्थळी प्रस्थान करा – पूरग्रस्त किंवा धोकादायक वाटत असलेल्या भागातील नागरिकांनी त्वरित सुरक्षित स्थळी, शाळा किंवा प्रशासनाने निश्चित केलेल्या निवारण केंद्रात स्थलांतर करावे.
  • प्रशासनाला सहकार्य करा – आपत्कालीन परिस्थितीत दिलेल्या सूचनांचे पालन करावे व बचाव कार्यात अडथळा आणू नये.
  • एकमेकांना मदत करा – संकटकाळात शेजारी-शेजाऱ्यांना व गरजूंना मदत करणे आवश्यक आहे.

प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात आहे. नागरिकांनी घाबरून न जाता संयम व सतर्कता राखावी. पुढील काही दिवसांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे सर्वांनी आवश्यक ती खबरदारी घेऊन सुरक्षित राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या…

💥 ब्रेकिंग : जळगाव विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन, खासदार ॲड. उज्ज्वल निकम यांनी केले स्वागत

💥 ब्रेकिंग: एनडीआरएफच्या निकषानुसार तीन पट मदत मिळावी, आमदार किशोर पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी…

💥श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात कन्या पूजनाचा अनोखा उपक्रम

9,703Popular Reads (Illustrative)
हॅलो जनताही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Designed & Developed by SM SOLUTION