Headlines

💥 ब्रेकिंग : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केली कृषी सेवा केंद्रांची पाहणी, तपासाला खतांचा साठा..

हॅलो जनता न्यूज, जळगाव, दि. २७ जुलै – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज जिल्ह्यातील विविध कृषी सेवा केंद्रांना अचानक भेट देत खत साठा, वितरण आणि विक्री व्यवस्थेचा प्रत्यक्ष आढावा घेतला. शेतकऱ्यांपर्यंत योग्य दरात आणि पारदर्शक पद्धतीने खते पोहोचविण्यासाठी त्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या.

🔍 जिल्हाधिकारी पाहणी : खत साठा व विक्री व्यवस्थेची पाहणी

श्री. प्रसाद यांनी कृषी सेवा केंद्रांमध्ये उपलब्ध असलेला खत साठा, त्याचे वितरण आणि डिजिटल पावती प्रणाली याचा बारकाईने तपास केला. त्यांनी प्रत्येक दुकानदाराकडून डिजिटल रेकॉर्ड दाखवून घेऊन खात्री केली की कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार किंवा तुटवडा नाही.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद खतांच्या साठ्याची पाहणी करताना…

जिल्हाधिकारी पाहणी अन् शेतकऱ्यांशी थेट संवाद

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सेवा केंद्रांवर आलेल्या शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. काही शेतकऱ्यांनी उशिरा खत मिळणे, वजनात तफावत व स्थानिक स्तरावर होणारी विलंबाची कारणे मांडली. यावर श्री. प्रसाद यांनी तात्काळ कारवाईचे निर्देश दिले व कोणत्याही शेतकऱ्याची फसवणूक होणार नाही, याची हमी दिली.

व्हॉट अप ग्रुप मध्ये ॲड होण्यासाठी – 

https://chat.whatsapp.com/C4RnWHy2exFDASxfn9FlWJ?mode=ac_c

जिल्हाधिकारी पाहणी : पारदर्शकता आणि नियोजनबद्ध वितरणावर भर

जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी विभागाचे अधिकारी व संबंधित दुकानदारांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “खते वेळेवर, योग्य दरात व शिस्तबद्ध वितरणासाठी डिजिटल पद्धतीचा वापर बंधनकारक करावा. कोणत्याही प्रकारची साठेबाजी किंवा दलाली सहन केली जाणार नाही. तसे आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल”

जिल्हाधिकारी पाहणी : अधिकाऱ्यांना दिले विशेष निर्देश

श्री. प्रसाद यांनी कृषी विभागातील अधिकाऱ्यांना सांगितले की, सर्व खत वितरण केंद्रांवर नियमित तपासणी मोहीम राबवावी, शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवावी व आवश्यक तिथे कारवाईसाठी सज्ज रहावे. या पाहणी दौऱ्यामुळे जिल्ह्यातील खत वितरण व्यवस्थेतील पारदर्शकता व शिस्तबद्धता अधिक मजबूत होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या…

💥 ब्रेकिंग : रेल्वेने प्रवास करताय मग ही बातमी वाचा, भुसावळ विभागातून धावणाऱ्या काही रेल्वेंच्या मार्गात बदल

💥 ब्रेकिंग : चाळीसगावात सापडले कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज, महामार्ग पोलिसांची मोठी कारवाई

💥 ब्रेकिंग : प्रफुल्ल लोढा यांची नार्को टेस्ट करा, सत्य जनतेसमोर येईल – दिलीप खोडपे

1,018Popular Reads (Illustrative)
हॅलो जनताही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Designed & Developed by SM SOLUTION