हॅलो जनता न्यूज, जळगाव – कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व भादली गावाचे माजी सरपंच मिलिंद चौधरी यांच्या पुढाकाराने बैलपोळा सणानिमित्त शेतकऱ्यांना बैलांसाठी आवश्यक असलेले साज व इतर उपयोगी साहित्य वाटप करण्याचा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला. हा कार्यक्रम दि. १७ ऑगस्ट २०२५ रोजी भादली बु. येथे पार पडला.
या उपक्रमाचे उद्घाटन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व गावातील नागरिकांची उपस्थिती होती.
बैलपोळा उपक्रम : पालकमंत्र्यांचे गौरवोद्गार
या वेळी बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, “शेती, माती आणि शेतकऱ्यांच्या समस्या समजणारी व्यक्तीच असा उपक्रम राबवू शकते. मिलिंद चौधरी यांनी केलेले कार्य शेतकऱ्यांच्या ऋणात जाणारे आहे.” त्यांनी शेतकऱ्यांना शेतीसोबत जोडव्यवसाय सुरू करण्याचे आवाहन केले. “नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीपासून शेतकरी वाचतील व प्रगती साधता येईल. यापुढे कृषी संलग्न व्यवसाय, प्रक्रिया उद्योग व प्रशिक्षण कार्यक्रम गावपातळीवर घेण्यासाठी चौधरी यांनी पुढाकार घ्यावा,” असेही ते म्हणाले.
बैल पोळा : शेतकऱ्यांचा खर्च वाचवणारा उपक्रम
भादली बु. गावातील सुमारे २७५ बैलजोडी धारक शेतकऱ्यांना या उपक्रमाअंतर्गत साज व उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले. यामुळे पोळ्याच्या सणासाठी होणारा मोठा खर्च वाचल्याचे समाधान शेतकऱ्यांनी व्यक्त केले. “मिलिंद चौधरी हे एक सामान्य शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेणारे कार्यकर्ते आहेत,” असे गौरवोद्गार यावेळी शेतकऱ्यांनी काढले.

या कार्यक्रमाला जळगाव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील, माजी पंचायत समिती सदस्य तुषार महाजन, सरपंच मनोज चौधरी, माजी उपसरपंच संदीप कोळी, ग्रामपंचायत सदस्य अरुण सपकाळे, तसेच विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक किरण रडे, प्रमोद चौधरी, परेश रडे, किशोर चौधरी, छोटू कोळी, विजू कावळे, मनोज इंगळे, पिंटू कोळी, किशोर कोळी, गणा आतरदे, किसन चौधरी, कौस्तुभ झांबरे, गोलू चौधरी, गणेश गोळी, रामचंद्र अत्तरदे, परेश लोखंडे, नरू कोल्हे, राजेंद्र चिनवल, प्रेमचंद झोपे, शुभम रडे, धनराज रडे लकी, शीताराम अतरदे, दिलीप नारखेडे, राहुल चिनवले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाळ ढाके यांनी केले. मिलिंद चौधरी यांनी प्रास्ताविकातून उपक्रमामागील उद्दिष्ट मांडले तर आभार प्रदर्शन सरपंच मनोज चौधरी यांनी केले. हा अभिनव उपक्रम शेतकऱ्यांच्या सणाला दिलासा देणारा ठरला असून, बैलपोळ्याचा सण अधिक उत्साहात आणि समाधानाने साजरा करण्यास मदत करणारा ठरल्याचे समाधान गावकऱ्यांनी व्यक्त केले.
इतर महत्वाच्या बातम्या….
💥ब्रेकिंग : विद्यापीठात भविष्यातील युद्धे आणि युद्ध पद्धती” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन
💥ब्रेकिंग : पाकिस्तानच्या प्रसिद्ध गोलंदाजाची गोळ्या मारून हत्या, व्हिडिओ व्हायरल..
