🛑ब्रेकिंग: पाचोरा भडगाव मतदार संघात भाजपचा नेता कोण? आगामी निवडणुकांचे निकाल ठरवतील

हॅलो जनता न्यूज, पाचोरा-भडगाव (प्रतिनिधी): स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका पाचोरा-भडगाव मतदारसंघात केवळ राजकीय सत्ता मिळविण्यापुरत्या मर्यादित राहणार नाहीत, तर या निवडणुका भाजपमधील अंतर्गत वर्चस्व ठरविणाऱ्या ठरणार आहेत. भाजपचे विद्यमान नेते अमोल शिंदे, माजी आमदार दिलीप वाघ, तसेच वैशाली सूर्यवंशी या तिघांमधील प्रतिष्ठेची लढाई आता उघडपणे सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे.
पाचोरा भडगाव निवडणूक : वर्चस्वाचा संघर्ष — तीन गट, एकच पक्ष
काही महिन्यांपूर्वी पाचोरा-भडगाव मतदारसंघात भाजपचे नेतृत्व अमोल शिंदे यांच्या हातात एकहाती होते. मात्र, माजी आमदार दिलीप वाघ आणि वैशाली सूर्यवंशी यांच्या भाजपमध्ये प्रवेशानंतर पक्षात नवे समीकरण तयार झाले आहे. या दोघांच्या प्रवेशामुळे अमोल शिंदे यांचे एकाधिकारशाही नेतृत्व आव्हानात आले असून, आता पक्षात तीन स्वतंत्र गट कार्यरत असल्याचे पाहायला मिळत आहे.
पाचोरा भडगाव निवडणूक : निवडणुकांमधून ठरणार भविष्यातील ‘नेता’
भाजपमध्ये या तिन्ही नेत्यांमधील वर्चस्व कोणाचे राहणार, हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर अवलंबून राहणार आहे. ज्या नेत्याचे समर्थक सर्वाधिक संख्येने निवडून येतील, तोच भविष्यात भाजपचा प्रमुख चेहरा म्हणून उदयास येईल, अशा चर्चा कार्यकर्त्यांत आणि जनतेत रंगू लागल्या आहेत. त्यामुळे या निवडणुका तिन्ही नेत्यांसाठी प्रतिष्ठेचा सवाल ठरल्या आहेत.
आमदार किशोर पाटील विरुद्ध भाजप — थेट सामना
दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये “स्वबळाचा नारा” दिल्याने पाचोरा-भडगाव मतदारसंघात भाजप विरुद्ध शिंदे सेना असा थेट संघर्ष होणार असल्याचे चिन्ह आहेत. भाजपने किशोर पाटील यांना राजकीय आव्हान निर्माण करण्यासाठी त्यांच्या विरोधकांना पक्षात स्थान दिल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. त्यामुळे आता ही निवडणूक फक्त सत्तेची नव्हे, तर ‘राजकीय अस्तित्व आणि नेतृत्व’ ठरविण्याची लढाई ठरणार आहे.
भाजपच्या अमोल शिंदे, दिलीप वाघ आणि वैशाली सूर्यवंशी या तिन्ही नेत्यांसाठी या निवडणुका पक्षातील भविष्यातील स्थान निश्चित करणाऱ्या ठरणार आहेत. प्रत्येकाने आपल्या कार्यकर्त्यांना संघटित करून, मतदारसंघातील स्थानिक संस्थांमध्ये जास्तीत जास्त जागा जिंकण्याचे मोठे आव्हान स्वीकारले आहे. भाजपमधील वर्चस्वाच्या या लढाईत कोण आघाडी घेतो, हे पाहणे आता राजकीयदृष्ट्या अत्यंत उत्सुकतेचे ठरणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या…
🛑पाचोरा ब्रेकिंग: निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांना आली जाग, आज रस्ता रोको आंदोलन
🛑 ब्रेकिंग: विकासाच्या नावाखाली शेकडो झाडांची कत्तल, प्रशासनाचे दुर्लक्ष
🛑 ब्रेकिंग: राहुरी पोलीस पोलिसांचा अनोखा उपक्रम, वाचन प्रेरणा दिनानिमित्त विशेष उपक्रम




