हॅलो राजकारण

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे यांचा धनंजय मुंडेवर तीव्र आरोप ; “पाप झाकण्यासाठी ओबीसींचा आसरा घेतात”

हॅलो जनता न्युज, छत्रपती संभाजीनगर :

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एक महिना पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर, त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी छत्रपती संभाजीनगरमधील पैठण येथे मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी आपली धारदार प्रतिक्रिया दिली. त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत सांगितले की, “धनंजय मुंडे हे पाप करण्यासाठी ओबीसींचा आसरा घेतात. त्यांच्या पापांना झाकण्यासाठी ते ओबीसींच्या मागे लपतात.”

संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांना न्याय मिळेपर्यंत आपल्याला मागे हटायचं नाही, असं स्पष्टपणे सांगत मनोज जरांगे म्हणाले, “त्यांनी कितीही गुन्हे दाखल केले तरी मला फरक पडत नाही.” आणखी एक धक्कादायक आरोप करत जरांगे म्हणाले, “संतोष देशमुखांच्या भावाला धमक्या दिल्यानंतर, जेव्हा आम्ही त्या गुंडांच्या विरोधात आवाज उठवला, तेव्हा आम्हावरच षडयंत्र रचून केसेस दाखल केली जात आहेत. हे काम धनंजय मुंडे यांच्या लाभार्थी बगलबच्च्यांचं आहे.”

जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी स्पष्टपणे इशाराही दिला, “तुमच्या लाभार्थी टोळीला आंदोलनं करायला लावता आणि आरोपीच्या बाजूने उभं राहता, हे चुकीचं नाही का? उद्या तुमच्या घरात एखादी व्यक्ती मरण पावली तर मराठ्यांनी सुद्धा असंच मोर्चे काढायचं का?” सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख यांच्या हत्येतले एकही आरोपी सुटला, तर सरकारला त्याची किंमत चुकवावी लागेल, असं इशारा देत मनोज जरांगे म्हणाले, “धनंजय मुंडेंनी जे प्रयोग सुरू केले आहेत, ते त्यांच्यासाठी अधिक गुंते वाढवणार आहेत. लोकांना सांगितलं जातंय की ‘रस्ता रोको करा’, ‘आंदोलन करा’. पण या प्रकारांमुळे ते अजून खोलात जात आहेत, हे त्यांना समजत नाही.”

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Jalgaon ZP : बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार, जळगाव जिल्हा परिषदेच्या सीईओंचे निर्देश…

E cabinet : महाराष्ट्रात राबविले जाणार ‘ई – कॅबीनेट’

Jalgaon Crime : लाच घेताना तलाठ्याला एसीबीने पकडले रंगेहाथ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button