हॅलो क्रीडा

🛑 जळगावात डॉ. वर्षा पाटील वुमन्स महाविद्यालयातर्फे आंतर महाविद्यालयीन भव्य क्रीडा स्पर्धांचे आयोजन

हॅलो जनता न्यूज, जळगाव – एस.एन.डी.टी. विद्यापीठ, मुंबई यांच्या वतीने तसेच गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. वर्षा पाटील वुमन्स महाविद्यालय यांच्या तर्फे भव्य आंतरमहाविद्यालयीन विद्यापीठ स्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा येत्या ८ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर २०२५ दरम्यान भव्य दिमाखात पार पडणार असून स्थळ म्हणून गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेज व एकलव्य क्रीडा संकुल निश्चित करण्यात आले आहे.

या स्पर्धांमध्ये देशभरातील विविध राज्यांमधील ३० हून अधिक महाविद्यालयांचा सहभाग नोंदवला गेला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र, नोएडा, केरळ, गुजरात आदी राज्यांतील महाविद्यालयांमधील सुमारे ४०० ते ४५० विद्यार्थीनी स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहेत. स्पर्धांमध्ये व्हॉलीबॉल, टग ऑफ वॉर, तायक्वांदो तसेच अॅथलेटिक्स (१००, २००, ४०० मीटर धाव, हायजंप, लाँगजंप) या प्रमुख क्रीडा प्रकारांचा समावेश असून प्रत्येक खेळासाठी कुशल पंच व प्रशिक्षकांची विशेष नेमणूक करण्यात आली आहे.

खेळाडूंच्या आरोग्याची काळजी म्हणून मैदानावरच डॉक्टरांची टीम तसेच आपत्कालीन अॅम्बुलन्स सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्पर्धांमधील विजेत्या खेळाडूंना प्रमाणपत्रे व ट्रॉफी प्रदान करण्यात येणार आहेत. स्पर्धांचा समारोप १० ऑक्टोबर २०२५ रोजी पार पडणार असून, या सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण यूट्यूब चॅनल व महाविद्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर केले जाणार आहे. या स्पर्धांमुळे जिल्ह्यातील तसेच राज्यातील खेळाडूंना स्पर्धात्मक वातावरणाबरोबरच क्रीडा क्षेत्रात स्वतःची गुणवत्ता सिध्द करण्याची संधी मिळणार आहे.

इतर महत्वाच्या बातम्या…

🛑 ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यातील ७ हजार लाडक्या बहिणी अपात्र, हे आहेत अपात्रतेचे निकष

🚨 लाडकी बहीण’ योजनेच्या केवायसीचे सर्व्हरच डाउन, ओटीपी येतं नसल्याने लाडक्या बहिणी हैराण…

🛑 सोलापूरच्या सुपुत्राचा भारतात डंका – UPSC IES परीक्षेत आठवा क्रमांक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button