⁠हॅलो क्राईम

🚨 जळगाव शहरात पोलिसांची ड्रग्स माफियांवर मोठी कारवाई

हॅलो जनता न्यूज, जळगाव : शहरातील मेहरुण बगीचा परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने सापळा रचून एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या एका व्यक्तीस पकडण्यात यश मिळवले आहे. तर दुसरा आरोपी अंधाराचा फायदा घेत फरार झाला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. २०) दुपारी सुमारे ३ वाजेच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांचे आदेश

अलीकडेच जळगाव जिल्ह्यात वाढत असलेल्या अमली पदार्थांच्या अवैध धंद्यावर आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी विशेष मोहिम राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार एलसीबीचे निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथक कार्यरत होते.

जळगाव पोलिस: गुप्त माहितीच्या आधारे सापळा

एलसीबीच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती की, मेहरुण बगीचातील जे.के. पार्कजवळील जुन्या स्विमिंग टॅंक परिसरात काहीजण एमडी ड्रग्सची विक्री करत आहेत. त्यानुसार पथकाने सापळा रचत छापा टाकला. यावेळी मास्टर कॉलनी येथील रहिवासी मोहम्मद हनीफ पटेल (वय ३५) हा इसम पथकाच्या हाती लागला. मात्र, त्याचा दुसरा साथीदार पोलीस पाहताच पळून जाण्यात यशस्वी झाला.

या कारवाईत पोलिसांनी मोहम्मद हनीफ पटेल याच्याकडून तब्बल ६० हजार रुपये किमतीची ६ ग्रॅम एमडी ड्रग्स पावडर, दोन मोबाईल फोन असा एकूण ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी पोलिस हवालदार अक्रम शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी योगेश घुगे करीत आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या…

🏆 मोहनलाल यांना चित्रपट सृष्टीतील सर्वात मानाचा पुरस्कार जाहीर, देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव…

🚨पाचोरा तालुक्यातील पूरग्रस्तांना आमदार किशोर पाटील यांच्या वतीने दिलासा….

🚨लाडकी बहीण योजना : तत्काळ इ केवायसी करा अन्यथा योजनेचा लाभ बंद होणार….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button