💥 ब्रेकिंग : महिला बचत गटांसाठी ‘बहिणाई मार्ट’, पाचोऱ्यात भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन

हॅलो जनता न्यूज, पाचोरा (अवी पाटील) : येथील महिला बचत गटांच्या उत्पादनांना हक्काचे मार्केट मिळावे या हेतूने जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सुमारे १ कोटी ४९ लाख रुपये खर्च करून उभारण्यात येणाऱ्या *‘बहिणाई मार्ट’* या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन उद्या शनिवार, दि. १२ जुलै २०२५ रोजी सकाळी १० वाजता आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते पार पडणार आहे.
हा ऐतिहासिक उपक्रम आमदार किशोर पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून साकार होत असून, खानदेशातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती मंगेश देवरे मुख्याधिकारी, नगरपरिषद पाचोरा, भैय्यासाहेब पाटील अभियंता, नगरपरिषद यांची राहणार आहे तर या कार्यक्रमाचे आयोजन पाचोरा शहरातील नगरपालिका जिन, येथे करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी शिवसेना-युवासेना, महिला आघाडी व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी, आजी-माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा-भडगाव संचालक मंडळ, शेतकी संघाचे पदाधिकारी, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, बुथ प्रमुख, शिवदूत व शिवसैनिक यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ‘बहिणाई मार्ट’ हे महिला बचत गटांसाठी केवळ एक विक्री केंद्र नसून, त्यांच्या आत्मनिर्भरतेचा कणा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या….
जिल्ह्यात पुन्हा गोळीबाराचा थरार : मनुदेवी फाट्याजवळ हॉटेल मालकावर गोळीबार
मागासवर्गीय कर्मचारी महासंघाची नवीन कार्यकारिणी जाहीर, अरुण सपकाळे यांची कार्याध्यक्षपदी फेरनिवड
💥ब्रेकिंग : क्रिकेट विश्वात खळबळ, या भारतीय क्रिकेटरला होणार दहा वर्षाचा कारावास….




