हॅलो सामाजिक

जळगाव शहरात उत्साहात साजरी झाली ‘भगवान श्री वराह जयंती’; सर्व समाज बांधवांची लाभली अलोट उपस्थिती.

हॅलो जनता प्रतिनिधी : जळगाव:

जळगाव : शहरातील प्रमुख केंद्रस्थान असलेल्या टॉवर चौक येथे आज भगवान श्री विष्णूंचे तिसरे अवतार ‘भगवान श्री वराह’ यांची जयंती सकल हिंदू समाज आणि हिंदू जागरण मंच यांच्या संयुक्त विद्यमाने अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे हिंदू समाजातील सर्व घटकांना एकत्र आणून हा उत्सव सामाजिक ऐक्याचा प्रतीक म्हणून साजरा करण्यात आला. समाजात प्रदीर्घ काळापासून उपेक्षित राहिलेल्या वाल्मीकी समाजाला या उत्सवाच्या मुख्य प्रवाहात विशेष आदराचे स्थान देण्यात आले, ज्यामुळे उपस्थितांमध्ये एकतेचा आणि आपुलकीचा संदेश गेला.

प्रमुख मान्यवरांची उपस्थिती व प्रतिमा पूजन

कार्यक्रमाप्रसंगी जळगाव शहराच्या महापौर सौ. दिपमाला काळे यांच्या हस्ते भगवान श्री वराह यांच्या प्रतिमेचे पूजन करून आरती करण्यात आली. या प्रसंगी जळगाव शहराचे लोकप्रिय आमदार सुरेश दामू भोळे (राजू मामा भोळे), महाराष्ट्र राज्य पणन उपाध्यक्ष रोहित निकम यांची विशेष उपस्थिती लाभली होती.

यावेळी बोलताना मान्यवरांनी सांगितले की, “भगवान श्री वराह यांनी ज्याप्रमाणे पृथ्वीचे रक्षण केले, त्याचप्रमाणे समाजात एकता, धर्मरक्षण आणि सामाजिक समरसता टिकवून ठेवणे ही आजच्या काळाची गरज आहे.”

या सोहळ्याला सकल हिंदू समाज, हिंदू जागरण मंच या संघटनांचे पदाधिकारी, वाल्मीकी समाजाचे प्रमुख प्रतिनिधी आणि शहरातील विविध क्षेत्रांतील अनेक प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. टॉवर चौकात जमलेल्या हिंदू बांधवांनी “भगवान श्री वराह” यांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून टाकला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button