हॅलो सामाजिक

💥 ब्रेकिंग : रेल्वेने प्रवास करताय मग ही बातमी वाचा, भुसावळ विभागातून धावणाऱ्या काही रेल्वेंच्या मार्गात बदल

हॅलो जनता न्यूज, भुसावळ :- उत्तर-मध्य रेल्वेच्या आग्रा विभागांतर्गत मथुरा स्थानकादरम्यान अप व डाऊन रेल्वेमार्गावर तांत्रिक कनेक्शनचे काम तसेच नव्याने उभारण्यात येणाऱ्या तिसऱ्या रेल्वेमार्गाच्या कनेक्टिव्हिटीसाठी मथुरा स्थानकात नॉन इंटरलॉकिंग कार्य हाती घेण्यात येणार आहे. यासाठी ३१ जुलै ते २ ऑगस्ट २०२५ या कालावधीत काही रेल्वेगाड्यांचे मार्ग बदलण्यात येणार आहेत.

चाळीसगावात कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज आढळले, पहा व्हिडिओ – 

भुसावळ विभागातून धावणाऱ्या खालील गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे:

क्र. १२७१५ : नांदेड – अमृतसर एक्स्प्रेस दि. १ ऑगस्ट रोजी आग्रा कँट, मितावली, गाझियाबाद, नवी दिल्लीमार्गे अमृतसरला जाईल

क्र. १२६१७ : एर्नाकुलम – हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस तसेच क्र.१२६२९ – यशवंतपूर – हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस या दोन्ही गाड्या ३१ जुलै रोजी आग्रा कँट, मितावली, गाझियाबादमार्गे निजामुद्दीन येथे पोहोचतील.

क्र. ११०७८ : जम्मूतावी – पुणे एक्स्प्रेस ही गाडी ३१ जुलै व १ ऑगस्ट रोजी नई दिल्ली, गाझियाबाद, मितावली, आग्रा कँटमार्गे पुण्याकडे धावेल.

क्र. १२७१६ : अमृतसर – नांदेड एक्स्प्रेस १ व २ ऑगस्ट रोजी नई दिल्ली, गाझियाबाद, मितावली, आग्रा कॅटमार्गे नांदेडला पोहोचेल, असे रेल्वेतर्फे कळविण्यांत आले आहे.

तरी प्रवाशांनी गाड्यांच्या मार्गात झालेले बदल लक्षात घेऊन आपला प्रवास पूर्वनियोजित करावा असे आवाहन रेल्वे विभागातर्फे करण्यात आलेले आहे.

महत्वाच्या बातम्या… 

💥 ब्रेकिंग : चाळीसगावात सापडले कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज, महामार्ग पोलिसांची मोठी कारवाई

💥 ब्रेकिंग : प्रफुल्ल लोढा यांची नार्को टेस्ट करा, सत्य जनतेसमोर येईल – दिलीप खोडपे

💥 ब्रेकिंग : प्रहारचे चक्काजाम आंदोलन; शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आक्रमक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button