आईसाठी लेकी मैदानात, वैशाली सूर्यवंशी यांच्या दोन्ही मुली निवडणुकीच्या प्रचारात सक्रिय…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा
अवघ्या राज्याचे लक्ष लागलेल्या पाचोरा वाडगाव मतदार संघात महायुतीकडून आमदार किशोर पाटील तर महाविकास आघाडी कडून त्यांच्या भगिनी वैशाली सूर्यवंशी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रचारासाठी अगदी काही दिवस राहिल्याने पाचोरा भडगाव मतदार संघात सर्वच उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू आहे.
महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली सूर्यवंशी यांच्या प्रचारासाठी आता त्यांच्या मुली देखील प्रचाराच्या मैदानात उतरल्या असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांच्या दोन्ही मुली सिध्दी व निधी सुर्यवंशी या पाचोरा भडगाव मतदार संघातील प्रचाराचा सक्रिय झाल्या असून त्यांचे विविध गावात दौरे सुरू झाले आहेत.
सिध्दी सूर्यवंशी ही बायोटेक्नोलॉजी या विषयात फर्ग्युसन कॉलेज येथे पदवीचे शिक्षण घेत असून स्वत: प्रचाराची धुरा सांभाळली आहे. पाचोरा शहरातील विविध भागांमध्ये जाऊन आपली आई वैशाली सुर्यवंशी यांच्यासाठी मते मागत नागरिकांशी संपर्क सुरू ठेवला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या…
ब्रेकिंग : आमदार मंगेश चव्हाण यांच्या विरोधात आचारसंहिता भंगाच्या तीन तक्रारी….
“त्या” अपक्ष उमेदवारांचा अर्ज वैध, पाचोरा भडगाव मतदार संघातील पेच सुटला….
Gold Market Jalgaon : “धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने-चांदीच्या किंमतीत घट: खरेदीसाठी सोनेरी संधी!”