अपक्ष उमेदवार अमोल शिंदेंना ग्रामीण भागात जनतेचा प्रचंड प्रतिसाद….

विधानसभा २०२४

हॅलो जनता न्युज – पाचोरा

पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार अमोल पंडितराव शिंदे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून ग्रामीण भागाचे दौरे सुरू केले आहेत. पाचोरा तालुक्यातील ग्रामीण भागात प्रचार दौरा सुरू केला असून या प्रचार रॅलीत अमोल शिंदेंना जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पाचोरा भडगाव मतदार संघाचा रखडलेला विकास पूर्ण करण्यासाठी अमोल शिंदे यांनी मतदारांना साद घातली आहे. प्रत्युत्तरात जनतेने गावोगावी उदंड प्रतिसाद दिल्याने अमोल शिंदे विजय निश्चित होईल असे चित्र निर्माण झाले आहे.

अमोल शिंदे यांनी पाचोरा तालुक्यातील वडगाव सतीचे, चुंचाळे, तर पिंपळगाव बु, नगरदेवळा- सिम व निपाणे या गावात प्रचार दौरा केला. तर सायंकाळी मोहाडी, पहाण, नांद्रा, कुरंगी व माहिजी इत्यादी गावांमध्ये आपला प्रचार दौरा पूर्ण केला. याप्रसंगी अमोल शिंदे यांचे सोबत पंचायत समिती माजी सभापती बन्सीलाल बापू पाटील, ॲड. योगेश पाटील तसेच प्रत्येक गावातील स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले होते.

गावोगावी झालेल्या प्रचार रॅलीत अमोल शिंदे यांच्या नावाच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. अमोल पंडितराव शिंदे यांचा अनुक्रमांक ७ व निशाणी शेतकरी बद्दलची माहिती कार्यकर्त्यांनी घरोघरी माता-भगिनींना करून दिल्याने अमोल शिंदे यांचा विजय आता निश्चित झाला आहे. गावोगावी मिळणारा प्रतिसाद, अमोल शिंदे यांचा वाढता जनसंपर्क यातून अमोल शिंदे यांच्या रॅलीला गावोगावी खूप मोठा प्रतिसाद मिळत आहे. मतदार संघात परिवर्तनाची लाट मोठ्या प्रमाणात असून या परिवर्तनाच्या लाटेत अमोल पंडितराव शिंदे हा एक आश्वासक चेहरा म्हणून जनतेने निश्चित करत विजयाचा विश्वास दिला आहे.

आता फक्त अमोल भाऊ आमदार, रावेर मतदार संघात अमोल जावळे यांचा प्रचाराचा झंझावात

माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचा डॉ.अश्विन सोनवणेंनी घेतला आशीर्वाद !

Dr. Anuj Patil : डॉ. अनुज पाटील यांचा प्रचाराचा जोरदार झंजावात सुरू शहरातील नामांकित डॉक्टरांचा सहभाग..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *