Gold Market Jalgaon : “धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने-चांदीच्या किंमतीत घट: खरेदीसाठी सोनेरी संधी!”
हॅलो जनता, जळगाव : Gold Market Jalgaon जळगावमध्ये दिवाळी पर्वाला सुरुवात झाली असून आज धनत्रयोदशीचा महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी नवीन भांडी, तसेच सोने आणि चांदीचे दागिने खरेदी करणे शुभ मानले जाते. यामध्ये सोने-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. धनत्रयोदशीच्या पूर्वसंध्येला, दोन्ही मौल्यवान धातूंच्या किंमतीत घट झाली आहे, ज्यामुळे खरेदीसाठी हा एक अनुकूल काळ ठरला आहे.
जळगाव सुवर्णपेठेत सोने दरात ४५० रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे आज सकाळच्या सत्रात २२ कॅरेट सोन्याचा दर ७२,५६० रुपये प्रति तोळा आणि २४ कॅरेट सोन्याचा भाव ७९,१५० रुपये प्रति तोळा इतका आहे. जीएसटीसह ८१,५२५ रुपये असा आहे. चांदीतही एक हजार ६०० रुपयांची घसरण झाली असून तिचा दर आता ९६,७०० रुपये प्रति किलो आहे.
गेल्या आठवड्यातील शेवटच्या दोन दिवसांत सोने भावात ७०० रुपयांची वाढ झाली होती, ज्यामुळे ते ७९,६०० रुपये प्रति तोळा पोहोचले. मात्र, सोमवारी ४५० रुपयांची घसरण होऊन ते ७९,१५० रुपये प्रति तोळा झाले. तसेच, ३०० रुपयांची वाढ झालेल्या चांदीचा दर सोमवारी एक हजार ६०० रुपयांनी कमी होऊन ९६,७०० रुपये प्रति किलोवर आला आहे.