⁠हॅलो क्राईम

💥 ब्रेकिंग : प्रफुल्ल लोढा यांची नार्को टेस्ट करा, सत्य जनतेसमोर येईल – दिलीप खोडपे

हॅलो जनता न्यूज, जामनेर (प्रतिनिधी) – शासनाने प्रफुल्ल लोढा याची इन कॅमेरा नार्को टेस्ट करावी सत्य काय ते राज्यासमोर आणावे अशी मागणी राष्ट्रवादी स्थानिक नेते दिलीप खोडपे सर यांनी केली. जामनेर येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.

प्रफुल्ल लोढा कुणाच्या जवळचा अख्या मतदारसंघाला माहीत आहे..

ते पुढे म्हणाले की, आमचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी वारंवार या विषयांवर मिडिया समोर आपले मत मांडले असून बराच विषय त्यांनी स्पष्ट केला आहे. प्रफुल्ल लोढा हा कोण असून किती वर्षापासून मधला दोन-तीन वर्षाचा कालखंड सोडला तर तो कोणाचा कार्यकर्ता आहे हे तालुक्याला वेगळं सांगण्याची गरज नाही.

व्हिडिओ – 

प्रफुल्ल लोढांची इन कॅमेरा नार्को टेस्ट करावी – दिलीप खोडपे

गंभीर स्वरूपाचे आरोप प्रफुल्ल लोढा यांनी केल्यावर ही त्याचे मधुर संबंध कोणाशी होते. हे सर्वांना माहीत असून सरकारने प्रफुल्ल लोढा याची इन कॅमेरा नार्को टेस्ट करावी म्हणजे सर्व प्रश्नांची, उत्तरे आपल्याला मिळेल व सत्य काय आहे असेल ते समोर येईल ते सत्य इतकं भयानक असेल की त्याची कल्पना ही कुणी केली नसेल असे वक्तव्य राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते दिलीप खोडपे यांनी केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली असून चर्चांना उधाण आले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या….

💥 ब्रेकिंग : प्रहारचे चक्काजाम आंदोलन; शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आक्रमक

शाळेत शिकवणार भगवद्गीता, ‘ या’ राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा निर्णय…

💥 ब्रेकिंग : आता पत्नीकडे फोन, बँकेचे पासवर्ड मागणे हा गुन्हा, उच्च न्यायालयाचा निर्णय

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button