आनदांची बातमी : लवकरच पाचोरा भडगाव शहरातील अतिक्रमित घरे नावावर मूळ मालकाच्या नावावर होणार….
हॅलो जनता, प्रतिनिधी – पाचोरा भडगाव शहरातील शासकीय जागांवरील अतिक्रमित घरे शासनाच्या नोव्हेंबर 2017 च्या शासकीय आदेशाप्रमाणे इमारत मालकांच्या नावावर लावण्याच्या हालचाली गतिमान झाल्या असून शुक्रवारी दुपारी या संदर्भात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या भूमिअभिलेख चे जिल्हा अधीक्षक श्री मगर तसेच पाचोरा मुख्याधिकारी मंगेश देवरे व भडगाव मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांच्यासोबत बैठक घेत वर्षानुवर्ष प्रलंबित असलेल्या या विषयाला गती दिली आहे.
पाचोरा आणि भडगाव शहरातील वर्षानुवर्षे अतिक्रमित जागेवर राहणाऱ्या नागरिकांची घरे शासन निर्णयानुसार नियमानुकूल करून लवकरच त्यांना आपल्या हक्काच्या घरांचे शासकीय उतारे देण्यासाठी आपण बांधील असून यासाठी कामाला गती दिली आहे. नागरिकांनी देखील मोजणी कामात सहकार्य करावे असे आवाहन आमदार किशोर पाटील यांनी केले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून आमदार किशोर पाटील यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू असून लवकरच हा विषय मार्गी लागेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या…
जळगावात वाळू माफिया सुसाट, भर वस्तीतून डंपरच्या माध्यमातून वाळू वाहतूक सुरू.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उद्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर…