💥ब्रेकिंग : जामनेरमध्ये अवैधरित्या गॅस भरताना भीषण स्फोट : एक गंभीर जखमी …

हॅलो जनता न्यूज, जामनेर (प्रतिनिधी) : जामनेर शहरातील बोदवद रोड परिसरात आज सकाळी अवैधरित्या घरगुती गॅस वाहनात भरण्याच्या ठिकाणी भीषण स्फोट झाला. या घटनेत एक मारुती ओमनी गाडी जळून खाक झाली असून एक व्यक्ती गंभीररित्या जखमी झाला आहे. सुदैवाने गाडीत बसलेले इतर महिला-पुरुष बाहेर असल्याने मोठा जीवितहानीचा प्रसंग टळला.
जामनेर स्फोट : कसा घडला अपघात?
मिळालेल्या माहितीनुसार, भडगावला जाणारी मंडळी रेवती येथून जामनेरमार्गे प्रवास करत होती. दरम्यान, बोदवद रस्त्यावर गाडीत अवैधरित्या गॅस भरण्याचे काम सुरू असताना अचानक सिलेंडरचा भडका उडाला. यानंतर जवळ ठेवलेल्या इतर सिलेंडरनाही आग लागली. पाहता पाहता गाडी ज्वाळांनी वेढली गेली. या घटनेत एक व्यक्ती भाजून गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जामनेर मध्ये अवैध धंद्यांचा खुलेआम कारभार
जामनेर शहरात घरगुती गॅसचा काळाबाजार उघडपणे सुरू असल्याचे उघड झाले आहे. बोदवद रोड, पाचोरा रोड, भुसावळ रोड परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध पद्धतीने वाहनांमध्ये गॅस भरण्याचे प्रकार सुरू आहेत. स्थानिक नागरिकांकडून यासंदर्भात वारंवार तक्रारी केल्या जात असूनही पोलिस प्रशासनाकडून कुठलीही ठोस कारवाई होत नसल्याचे आरोप आहेत.
या भीषण अपघातानंतर परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाच्या आशीर्वादानेच हे धंदे सुरू असल्याचा संशय जनतेत व्यक्त होत असून तातडीने अशा अवैध गॅस भरणाऱ्या ठिकाणांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱ्या या धंद्यांवर बंदी आणली नाही, तर अशा घटना पुन्हा घडण्याची भीती व्यक्त होत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या…
💥 ब्रेकिंग : गिरणा पुलावरील वाहतूक पुन्हा सुरू, मात्र पुलाला मध्यभागी तडा गेल्याची माहिती…
भडगाव गिरणा पूल वाहतुकीसाठी खुला पण, प्रशासनाच्या सूचना…
💥 ब्रेकिंग: गिरणा नदीच्या पाणी पातळीत वाढ, भडगाव पुलावरील वाहतूक बंद….




