⁠हॅलो क्राईम

गांजाची तस्करी उधळली : चोपडा पोलिसांची मोठी कारवाई

चोपडा, दि. २७ मे २०२५ – चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या पथकाने गांजाची मोठ्या प्रमाणावर तस्करी उधळत एकास अटक केली असून सुमारे २.३० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक श्री. मधुकर साळवे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, आज सकाळी १० वाजता बोपडा चुंचाळे रोडवरील एम.एस.डब्ल्यू. कॉलेजजवळ सापळा रचण्यात आला. चुंचाळेकडून चोपड्याकडे येणाऱ्या एमपी ४६ एमडब्ल्यू ६५८५ क्रमांकाच्या दुचाकीवर आलेल्या संशयितास थांबवून झडती घेतली असता, त्याच्या दुचाकीवर असलेल्या गोणीत १० किलो ६०० ग्रॅम गांजा आढळून आला.

अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव कालुसिंग गोराशा बारेला (वय २६, रा. महादेव, ता. शिरपूर, जि. धुळे) असे असून, त्याच्याकडून एकूण २,३०,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात गांजाबरोबरच दुचाकी आणि रोख रक्कम यांचाही समावेश आहे. या प्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा (गु.र.क्र. ३३७/२०२५) नोंद करण्यात आला आहे.

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मा. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक मा. कविता नेरकर, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत पो.नि. मधुकर साळवे, सपोनि एकनाथ भिसे, पोहेकी संतोष पारधी, लक्ष्मण शिगाणे, रितेश चौधरी, ज्ञानेश्वर जवागे, पो.ना. संदीप भोई, विनोद पाटील, निलेश वाघ, महेंद्र पाटील आदींनी सहभाग घेतला. चोपडा पोलिसांच्या या तत्परतेमुळे शहरात गांजाच्या तस्करीला आळा बसण्यास मदत होणार आहे.

इतर महत्वाच्या बातम्या…..

चाळीसगावकरांना त्रास देणारी ‘शांताबाई’ अखेर पोलिसांच्या जाळ्यात …

सैनिकांसाठी साखरपुड्यातून मदतीचा हात, जळगावच्या प्रियंका पाटील यांचा स्तुत्य उपक्रम

Gharkul Yojna : लाभार्थ्याला मिळाले पक्के घर, एक वर्षापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली होती भेट…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button