⁠हॅलो संवाद

Jalgaon : दांडेकर नगर, पिंप्राळा येथे १५ ते २२ मे श्री शिवमहापुराण संगितमय कथेचे आयोजन

हॅलो जनता (जळगाव) – श्री नृसिंह भगवान जयंती महोत्सव निमित्त पिंप्राळा येथील श्री विघ्नहर्ता गणेश मित्र मंडळ, दांडेकर नगर तर्फे भव्य दिव्य संगीतमय श्री शिव महापुराण कथेचे दिनांक १५ मे ते २२ मे २०२४ कालावधीत भव्य आयोजन करण्यात आले आहे. आयोजनाचे हे शुभारंभ वर्ष असून यासाठी राज्यस्तरीय सुप्रसिद्ध कथा प्रवक्ता कृष्णप्रेमी श्री मनोजचंद्रजी महाराज ( श्री वृंदावन धाम ) कथा सादर करणार आहेत.कार्यक्रमाचे स्थळ भवानी माता मंदिर जवळ, दांडेकर नगर पिंप्राळा आहे.

ही आहे कार्यक्रमाची रूपरेषा

सकाळी पाच ते सहा – काकडा आरती , संध्याकाळी पाच ते सहा – हरिपाठ, रात्री साडेसात ते साडेदहा – शिवपुराणकथा आणि समारोपाच्या चरणात दिनांक २२ मे २०२४ रोजी सकाळी नऊ ते अकरा कालावधीत काल्याचे किर्तन असून दुपारी बारा ते दोन वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन केले आहे तरी भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा .

कथा प्रवक्ते मनोजचंद्रजी महाराज यांना कथा काळात संगीत साथ देणारे संगीत साथीदार पुढील प्रमाणे सिंध वादक – ह. भ. प. जगदीश महाराज पवार ( म.प. ), तबलावादक – ह .भ .प .गोपाळ महाराज राठोड ( म.प्र.), बासरी वादक – राजेश भैय्या राठोड ( जळगाव ), ऑक्टोपॅड वादक – ह. भ. प. निखिल महाराज ( पारगावकर ) तसेच झाकी सजावट – ह.भ.प. राम महाराज (पाळधी ), त्याचप्रमाणे साऊंड सिस्टिम श्री इच्छादेवी सर्विस ( शेलवड ) मंडप व्यवस्था – श्री गणेशा प्रिंट हाऊस ( पिंप्राळा ) व प्रकाश व्यवस्था – श्री दीपक कुलकर्णी लाइट्स हे महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळणार आहेत.असे एका प्रसिद्धी पत्रकारान्वये आयोजक श्री विघ्नहर्ता गणेश मित्र मंडळ, दांडेकर नगरच्या संस्था कार्यकर्त्यांनी कळवले आहे . त्याचप्रमाणे सदरहू संगीतमय शिवमहापुराण कथेचा पिंप्राळा आणि परिसरातील सर्व भाविकांनी बहुसंख्येने लाभ घ्यावा असे आवाहनही मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आवर्जून केले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Jalgaon police : अवघ्या तीन तासात मिळाली हरवलेली बॅग परत, पोलिसांनी असा घेतला शोध…

Loksabha Elections : महिला व बालकल्याण विभागाच्या प्रयत्नाने दुर्लक्षित महिलांने केले मतदान

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button