⁠हॅलो क्राईम

Pachora Accident : जारगाव चौफुलीवरील अतिक्रमणामुळे अजून एक निष्पाप महिलेचा बळी, निर्लज्ज प्रशासनाला जाग येणार का?

हॅलो जनता पाचोरा – शहरातील जारगाव चौफुलीवर जळगाव कडे जाताना ट्रक आणि मोटरबाईक अपघातात पती समोर पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यात ट्रक चालका विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. महिलेचा जागीच मृत्यू झाल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. येत्या आठ दिवसांत अतिक्रमण धारकांविरोधात तात्काळ कारवाईची मागणी नागरिकांनी केली असून तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे की, शेख इस्माईल अब्दुलनबी मणियार रा. गिरड ता. भडगाव हे आपली पत्नी सना शेख इस्माईल मणियार (वय – २६ वर्ष) यांची प्रकृती खराब असल्याने त्यांना पाचोऱ्यातील जारगाव चौफुली खाजगी रुग्णालयात प्रकृती दाखविण्यासाठी सकाळी मोटरसायकलवरून निघाले होते. दरम्यान जारगाव चौफुली परिसरातील बेशीस्त वाहतुक व वाढते अतिक्रमण यामुळे शेख इस्माईल मणियार हे आपली मोटरसायकल चालवित असताना रस्त्यावर एक ट्रक मागे येत असताना त्याच्या चाकाखाली सना शेख इस्माईल मणियार ह्या सापडुन त्यांचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला. तर शेख इस्माईल मणियार यांचेसह त्यांच्या आई शानुरबी अब्दुलनबी मणियार व ४ वर्षीय महिरा शेख इस्माईल मणियार हे गंभीर जखमी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Pachora Accident : काॅंग्रेसचे पाचोरा तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या सतर्कतेने वाचले इतर जखमींचे प्राण….

घटनेची माहिती मिळताच काॅंग्रेसचे पाचोरा तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, इरफान मणियार, लतीफ शेख राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चे अझर खान, हे घटनास्थळी दाखल होवून त्यांनी मयत सना शेख इस्माईल मणियार व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले आणि त्या ठिकाणी संतप्त नागरिकांची देखील समजूत काढली…

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Jalgaon : दांडेकर नगर, पिंप्राळा येथे १५ ते २२ मे श्री शिवमहापुराण संगितमय कथेचे आयोजन

Jalgaon police : अवघ्या तीन तासात मिळाली हरवलेली बॅग परत, पोलिसांनी असा घेतला शोध…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button