राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींसाठी येत्या २ डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होऊ निकाल जाहीर होणार आहे. या पार्स्वभूमीवर गिरीश महाजन व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांच्यात राजकीय कलगीतुरा रंगला आहे. महाजन म्हणाले, कोण ओळखतो त्या खडसेला? त्यांनी काही दिवसांपूर्वी मुक्ताईनगरात आपली ताकद कमी झाल्याचे म्हटले होते. त्यांचे बरोबरच आहे. ते काहीही चुकीचे म्हणाले नाहीत. खडसे राष्ट्रवादीचे नेते आहेत. ते असे म्हणत असतील तर त्यांचे बरोबरच आहे.
खडसेंचे घरातल्या घरातच राजकारण सुरू, मंत्री महाजनांचा गंभीर आरोप
एकनाथ खडसे सध्या कोणत्या पक्षात आहेत हे ही कळत नाही. त्यांच्याविषयी बोलण्यासारखे आता काहीही राहिले नाही. खडसेंनी लोकसभा निवडणुकीत आपल्या सुनेला मदत केल्याचा दावा केला. ते प्रत्येक निवडणुकीत स्वतःची भूमिका बदलत असतात. एकमेकांना शिव्या द्यायच्या आणि घरातल्या घरात राजकारण करायचे असे त्यांचे सध्या चालले आहे. आत्ता मुक्ताईनगरमध्ये आमचे मित्र चंद्रकांत पाटील हे वेगळे लढत आहेत.
खडसे महाजन वाद : एकतरी नगरपंचायत निवडून आणून दाखवा
गिरीश महाजन यांनी यावेळी एकनाथ खडसे यांना जिल्ह्यातील एखादी तरी नगरपंचायत निवडून आणून दाखवण्याचेही आव्हान दिले. आता एकनाथ खडसेंचे काहीही शिल्लक राहिले नाही. जिल्ह्यात निकाल लागल्यानंतर कुणाची ताकद किती अर्थात ठाकरे गटाची ताकद किती, काँग्रेसची ताकद किती व शरद पवारांच्या पक्षाची ताकद किती हे कळेल. खडसेंनी जिल्ह्यातील एखादी तरी नगरपालिका निवडून आणून दाखवावी, असे ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या…
🚨 ब्रेकिंग : चोपडा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाची भाजपची उमेदवारी जाहीर
🚨 ब्रेकिंग : जळगाव मनपा निवडणूक, शिंदेसेनेची स्वबळाची तयारी सुरू…
🚨 ब्रेकिंग : पाचोरा पोलीस ॲक्शन मोडवर, नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कडक कारवाई सुरू
