हॅलो राजकारण

Sharad Pawar Public meeting : खडसेंच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांची जाहीर सभा, 3 मे रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर….

हॅलो जनता (जळगाव) – माजी केंद्रीय कृषी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar Public meeting) येत्या 3 मे रोजी जळगांव जिल्हयात येत आहेत. रावेर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ या दिवशी चोपडा व मुक्ताईनगर येथे शरद पवार यांच्या जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे. तर भुसावळ येथे पवार यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीचा मेळावा होणार आहे.

रावेर लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ पक्षाध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar Public meeting) व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत चोपडा येथे सकाळी साडे दहा वाजता जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर दुपारी सव्वा चार वाजता भुसावळ येथील संतोषी माता हॉलमध्ये महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे. तर संध्याकाळी सात वाजता मुक्ताईनगर येथील कोथळी रोडवरील मुक्ताई क्रीडा संकुल येथे शरद पवार यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

Sharad Pawar Public meeting : खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या घोषणेनंतर शरद पवारांची मुक्ताईनगरात पहिलीच सभा….

एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला सोडत भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे जाहीर केल्यानंतर पहिल्यांदाच शरद पवार (Sharad Pawar Public meeting) यांची मुक्ताईनगर मध्ये जाहीर सभा होणार आहे त्यामुळे ते नेमकं एकनाथ खडसेंसह भाजपवर काय टीका करतात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. तरी नागरिकांनी अधिकाधिक संख्येने चोपडा, भुसावळ व मुक्ताईनगर येथे उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Yogi Adityanath : या निवडणुकीनंतर काँग्रेस इतिहास जमा होणार – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

VBA Jalgaon : जळगावात ठाकरेंची सेना आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये जुंपली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button