आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत शिवसेनेचा भगवा फडकविण्याचा निर्धार पाचोरा येथे शिवसंवाद मेळावा
पाचोरा, दि. २४ सप्टेंबर : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाचोरा येथे शिवसेनेच्या वतीने शिवसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. आमदार बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या मेळाव्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पाचोरा-भडगाव मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकविण्याचा निर्धार करण्यात आला. या मेळाव्यास आमदार किशोर आप्पा पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, भडगाव…
