Headlines

💥 ब्रेकिंग 💥 मंत्री गिरीश महाजन यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप, एक रुपयाही निधी दिला नाही…

हॅलो जनता, मुंबई | राज्यातील सत्तेतील वरिष्ठ नेत्यांमध्ये मतभेदाचे सूर पुन्हा एकदा उफाळून आले असून, राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. एका वृत्तवाहिनीच्या चर्चासत्रात बोलताना गिरीश महाजन यांनी सांगितले की, ते विरोधी पक्षात असताना अजित पवार यांनी त्यांना स्पष्ट शब्दांत सांगितले होते – “मी तुला एक रुपये…

Read Full News

मुक्ताईनगर तालुका ऍग्रो डीलर्स असोसिएशनची बैठक, संघटनेचे राज्याध्यक्ष विनोद तराळ यांचे मार्गदर्शन

हॅलो जनता, मुक्ताईनगर –  मुक्ताईनगर तालुका ऍग्रो डीलर्स असोसिएशनची महत्वाची बैठक मुक्ताई मंदिर परिसरात संपन्न झाली. या बैठकीस संघटनेचे राज्याध्यक्ष विनोद तराळ पाटील हे अध्यक्षस्थानी होते. कृषी केंद्र चालकांच्या चालू हंगामातील अडचणी, शासकीय नियमावली, खत-बियाण्यांचा पुरवठा यासारख्या विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली. यावेळी उपस्थित डीलर्सना मार्गदर्शन करताना संघटनेचे राज्य अध्यक्ष विनोद तराळ यांनी अत्यंत मोलाचे…

Read Full News

💥ब्रेकिंग 💥 निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष बदलणार, यांची लागणार वर्णी….

हॅलो जनता, प्रतिनिधी –  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मोठे संघटनात्मक बदल केले जाणार आहेत. महाराष्ट्राध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष बदलण्याची प्रक्रिया वेगाने पुढे चालू आहे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जागी कोण निवडला जाईल, ह्यावर सध्या चर्चा जोमात आहे. भाजपा तीन राज्यांमध्ये – पश्चिम बंगाल, उत्तराखंड आणि महाराष्ट्र यात नवीन अध्यक्ष निवड प्रक्रिया सुरू झाली आहे….

Read Full News

💥 ब्रेकिंग : शिंदेसेनेची पाचोऱ्यात स्वबळाची तयारी? आज होणार फैसला

हॅलो जनता, पाचोरा, ता. २८ जून २०२५  शिवसेना (शिंदे गट) तर्फे पाचोऱ्यातील प्रसाद हॉल येथे आज भव्य निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करून संघटनात्मक बळकटतेचा निर्धार करण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यात आगामी निवडणुका महायुती म्हणून लढवायच्या की स्वबळावर या बाबत आज फैसला होण्याची…

Read Full News

पाचोऱ्यात शेकडो तरुणांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश; इनकमिंग थांबेना…

हॅलो जनता, पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा शहरात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, शहरातील शेकडो तरुणांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे. हा भव्य प्रवेश सोहळा आमदार किशोर पाटील यांच्या उपस्थितीत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. पाचोरा शहरातील शिवसेना शिंदे गटाच्या प्रमुख कार्यालयात आयोजित या कार्यक्रमात तरुणांनी एकमुखाने शिवसेनेचा…

Read Full News

जनसेवक बंडू सोनार नगरसेवक व्हावे यासाठी रामेश्वरम येथे देवाला साकडे, जय सोमवंशी व तरुणांचा पुढाकार

हॅलो जनता, पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा शहरातील प्रभाग क्रमांक ८ मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून निष्कलंक आणि निस्वार्थपणे कार्यरत असलेले जनसेवक बंडूभाऊ केशव सोनार यांच्याबाबत जनतेमध्ये विशेष उत्साह आणि आदर निर्माण झाला आहे. कोणतेही पद किंवा राजकीय प्रतिष्ठा न बाळगता समाजाच्या हितासाठी झटणारे बंडू सोनार यांचे कार्य आता अधिकच गाजत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रभागातील नागरिक, विशेषतः…

Read Full News

विद्यापीठाच्या परिसर मुलाखतीत सात विद्यार्थ्यांची निवड, कुलगुरूंनी दिल्या शुभेच्छा…

हॅलो जनता, जळगाव दि. २६ (प्रतिनिधी) – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी संस्थेतील सात विद्यार्थ्यांची परिसर मुलाखतीमध्ये निवड झाली असून कुलगुरू प्रा व्ही. एल. माहेश्वरी यांच्या हस्ते त्यांना आज नियुक्तीपत्रे देण्यात आली. विद्यापीठाच्या केंद्रीय प्रशिक्षण व नियुक्ती कक्षाअंतर्गत युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी येथे बी. टेक केमिकल इंजिनिअरिंग च्या…

Read Full News

पाचोरा बाजार समितीकडून शेतमाल तारण कर्ज वितरण; २ लाखांचा धनादेश वितरित

हॅलो जनता पाचोरा, ता. २४ जून  अवकाळी पावसामुळे व बाजारातील प्रतिकूल परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतमाल तारण कर्ज योजना प्रभावीपणे राबवण्यास सुरुवात केली आहे. या योजनेअंतर्गत आज शेतकरी अनिल विश्वासराव पाटील (रा. पाचोरा) यांना २ लाख रुपयांचा धनादेश बाजार समितीच्या…

Read Full News

मैत्रेय कंपनीच्या गुंतवणूकदारांना न्याय मिळणार, आमदार किशोर पाटील यांच्या पाठपुराव्यानंतर शासनाची ठोस कारवाई सुरू…

हॅलो जनता प्रतिनिधी मुंबई / जळगाव –  जळगाव जिल्ह्यातील आणि राज्यातील हजारो गुंतवणूकदारांची मैत्रेय ग्रुप मध्ये फसवणूक झाल्यानंतर गुंतवणूकदारांनी न्याय मिळावा यासाठी आमदार किशोर पाटील यांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू होता. अनेक ठेवीदारांनी आमदार किशोर पाटील यांची भेट घेऊन न्यायाची मागणी केली होती. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार किशोर पाटील यांनी तत्काळ गृह मंत्रालयाकडे पत्र…

Read Full News

निरोप समारंभ ; सर्व कर्मचारी शेतकऱ्यांची एकच भावना “असा अधिकारी होणे नाही”

हॅलो जनता, प्रतिनिधी – पाचोरा तालुक्यात कृषी विभागाच्या योजना आणि शेतकऱ्यांना उत्तम मार्गदर्शन करणारे कर्तव्य दक्ष तालुका कृषी अधिकारी श्री. रमेश निना जाधव यांची प्रशासकीय कारणास्तव तालुका कृषी अधिकारी, जळगाव जामोद या ठिकाणी बदली झालेली आहे. त्या कारणाने तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने श्री. रमेश निना जाधव यांच्या निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION