Headlines

ब्रेकिंग : राज्यातील ३० टक्के कुटुंबाचे स्वस्त धान्य बंद होणार, हे आहे कारण….

हॅलो जनता न्युज  स्वस्त धान्याच्या लाभार्थ्यांना राज्य शासनाने ई-केवायसी बंधनकारक केली आहे. मागील सहा महिन्यांपासून पुरवठा विभाग त्यावर काम करीत असले तरी ३० टक्के लाभार्थ्यांनी अद्याप ई-केवायसी केली नसल्याने त्यांचा धान्य पुरवठा बंद करण्याची ताकीद देण्यात आली आहे. राज्यात पुणे जिल्हा तर अगदी तळाला असल्याचे पाहायला मिळत आहे.वारंवार अंतिम मुदत, तारखा देऊनही राज्यभरात केवायसीचे काम…

Read Full News

जिल्हा कृषी औद्योगिक संस्थेची निवडणुक बिनविरोध, रोहित निकम यांचे नेतृत्व सिद्ध

हॅलो जनता न्युज, जळगाव जळगाव जिल्हा कृषी औद्योगिंक सर्व सेवा सहकारी संस्थेची पंचवार्षिक निवडणुक जिल्हा दुध संघाचे संचालक रोहीत दिलीपराव निकम यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध पार पडली. बिनविरोध निवडणुक होण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री संजय सावकारे, पदमश्री ॲड.उज्वल निकम, आ.मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नातून निवडणुक बिनविरोध झाली. यासंस्थेच्या निवडणुकीचे वैशिष्ट म्हणजे महाराष्ट्र राज्य…

Read Full News

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेत खांदेपालट, नवीन चेहऱ्यांना संधी….

हॅलो जनता न्युज, जळगाव  आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेत खांदेपालट करण्यात आली असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने जळगाव जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. जळगाव जिल्ह्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा लोकसभा संघटक बदलण्यात आले आहेत. जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत चांगली कामगिरी करता यावी…

Read Full News

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना न्यायालयाने ठोठावला दंड, काय आहे नेमका प्रकार…

हॅलो जनता न्यूज स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याचा आरोप करत दाखल केलेल्या खटल्याच्या सुनावणीस लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सातत्याने अनुपस्थित राहिल्याने उत्तर प्रदेशातील लखनऊ न्यायालयाने त्यांना २०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच त्यांना १४ एप्रिल रोजी न्यायालयात हजर राहण्याचा आदेश दिला. ते अनुपस्थित राहिल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असे न्यायालयाने म्हटले. इतर महत्वाच्या…

Read Full News

पाचोऱ्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेस आक्रमक, विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन

हॅलो जनता, (गजानन गिरी) पाचोरा –  पाचोरा तालुका कॉग्रेस तर्फे आज दि ३ रोजी भाजपा सरकार ने दिलेले आश्वासन पूर्ण करावे या मागणीसाठी काँग्रेस तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय धरणे आंदोलन केले आहे. या आंदोलनात भाजपने जाहीरनाम्यामध्ये आश्वासन दिल्याप्रमाणे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे. सोयाबीन, कापूस, तूर, हरभरा या पिकांची शासनाने खरेदी करावी…

Read Full News

चौकशीतील दिरंगाई चोपडा पोलिसांच्या अंगाशी, नेमका काय आहे प्रकार…

हॅलो जनता न्युज (चोपडा) चोपडा येथील मुस्तफा अँग्लो उर्दू प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांच्या संशयास्पद भरती प्रक्रियेविरोधात दाखल गुन्ह्याच्या तपासात दिरंगाई केल्याने चोपडा पोलिसांना दि. १५ मार्च रोजी उच्च न्यायालयात हजर राहण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. खोट्या स्वाक्षऱ्या, दस्तऐवज बनवून १३ शिक्षकांची पदभरती करून शासनाचा निधी लाटल्याची तक्रार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चिरागोद्दीन शेख…

Read Full News

तीन दिवस रेल्वेचा मेगा ब्लॉक, रेल्वेच्या वाहतुकीवर “असा” होईल परिणाम…

हॅलो जनता, भुसावळ प्रतिनिधी – भुसावळ रेल्वे विभागातील जळगाव आणि भादली रेल्वे स्थानका दरम्यान तीन दिवस विशेष वाहतूक व पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे. आजपासून सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत हा विशेष वाहतूक व पॉवर ब्लॉक आजपासून लागू करण्यात आला आहे. १ मार्च पासून ३ मार्च पर्यंत हा पावर ब्लॉक राहणार असून प्रवाशांनी आपल्या प्रवास…

Read Full News

गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन

गजानन गिरी (विशेष प्रतिनिधी) पाचोरा – आज दि. 28 रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त पाचोरा शहरातील गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल मध्ये विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे अनिल भाई दुलानी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करत उद्घाटन करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रेम शामनानी, अनिल भाई दुलानी, राम केसवानी, हरी भाऊ पाटील, डॉ. मनीष चंदनानी,…

Read Full News

पाचोरा तालुक्यात चोरट्यांचा सुळसुळाट, जारगावात घरफोडी लाखोंचा ऐवज लंपास

हॅलो जनता न्युज विशेष प्रतिनिधी (गजानन गिरी)  पाचोरा शहरासह परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट वाढला असून पाचोरा तालुक्यातील जारगाव येथील सेवानिवृत्त पोस्टमास्तर यांच्या बंद घरात चोरट्यांनी डल्ला मारून लाखों रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या प्रकरणी पाचोरा पोलिस स्थानकात अज्ञात चोरट्याविरोधात चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, सेवानिवृत्त पोस्टमास्तर सुभाष फकिरा मोरे यांचे…

Read Full News
आकाशवाणी चौकातील हॉटेल

आकाशवाणी चौकातील हॉटेलच्या किचनला आग ; मेडीकल दुकानाचे नुकसान !

हॅलो जनता न्युज, जळगाव : जळगाव शहरातील आकाशवाणी चौकातील हॉटेल मुरली मनोहरच्या किचनमध्ये गुरुवार दि. ६ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे २ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. काही वेळातच आगीने रौद्ररुप धारण केले. या आगीमुळे बाजूला असलेल्या मेडीकलच्या दुकानाचेही नुकसान झाले आहे. दरम्यान, अग्निशमन विभागाच्या बंबाने आगीवर नियंत्रण मिळवित आग आटोक्यात आणली. शहरातील आकाशवाणी चौकातील तळघरात…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION